नीरजने पानिपतसाठी रचला नवा वाक्प्रचार; आता पराभवासाठी नाही; तर विजयासाठी “पानिपत”ची म्हण वापरायची…!!


विनायक ढेरे

नाशिक : नीरज चोप्रा याने भारतीय ऑलिंपिकच्या इतिहासात स्वतःचेच नाव सुवर्णाक्षरांनी कोरले असे नाही, तर त्याचे गाव पानिपतचे देखील नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. javelin thrower Neeraj Chopra’s residence in Panipat, Haryana

किंबहुना नीरज चोप्राने भारताच्या इतिहासात पानिपतचा उल्लेख करताना जे पराभवाचे सावट येते ते सावटच एक प्रकारे दूर केले आहे. पानिपतच्या युद्धात मराठे हरवल्याचा समज पसरल्यामुळे मराठीत एक वाक्प्रचार पडला होता. हरणाऱ्याला “त्याचे पानिपत झाले”, असे म्हटले जायचे. परंतु नीरज चोप्रा या पानिपतच्या लढवय्या खेळाडूंमुळे इथून पुढे जिंकल्याबद्दल “त्याने पानिपत केले”, असे म्हणायला हरकत नाही.पानिपतच्या तेवीस वर्षाच्या नीरज चोप्रा याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकीत सुवर्णपदक मिळवले. पानिपतमध्ये त्याच्या घरासमोर मंडप टाकून शेकडो पानिपतकरांनी त्याच्या विजयाचा खेळ पाहिला आणि आनंद लुटला. एक प्रकारे ते पानिपतच्या या विजयाच्या इतिहासाचे साक्षीदार झाले.

त्यामुळेच हरल्याबद्दल एखाद्याचे “पानिपत झाले” हा वाक्प्रचार आता नीरज मुळे जिंकल्यानंतर एखाद्याने “पानिपत केले” असा बदलला पाहिजे आणि तो बदलण्याची किमया नीरजने आपल्या प्रचंड कर्तृत्वाने केली आहे. भविष्यात विजयासाठी _त्याने पानिपत केले” हा वाक्प्रचार रूढ केला पाहिजे.

javelin thrower Neeraj Chopra’s residence in Panipat, Haryana

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण