Afghanistan : आंतरराष्ट्रीय दबावापुढे झुकला तालिबान, गुरुद्वारातून काढलेले निशाण साहिब पुन्हा स्थापित

Afghanistan Sikh religious flag restored at Gurdwara Thala Sahib in Paktia Chamkani area

Afghanistan : अफगाणिस्तानच्या पख्तिया प्रांतातील एका गुरुद्वारामधून काढण्यात आलेला निशाण साहिब पुन्हा लावण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय दबाव आणि भारताच्या निषेधादरम्यान तालिबान अधिकारी आणि सुरक्षा दलांनी गुरुद्वारा थाला साहिबला भेट दिली. तालिबानने असेही म्हटले आहे की, गुरुद्वारा त्याच्या रीतिरिवाजानुसार चालू राहील. हा गुरुद्वारा ज्या चमकनी भागात आहे, तिथे शीख धर्माचे संस्थापक गुरू नानकदेखील गेले होते. Afghanistan Sikh religious flag restored at Gurdwara Thala Sahib in Paktia Chamkani area


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : अफगाणिस्तानच्या पख्तिया प्रांतातील एका गुरुद्वारामधून काढण्यात आलेला निशाण साहिब पुन्हा लावण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय दबाव आणि भारताच्या निषेधादरम्यान तालिबान अधिकारी आणि सुरक्षा दलांनी गुरुद्वारा थाला साहिबला भेट दिली. तालिबानने असेही म्हटले आहे की, गुरुद्वारा त्याच्या रीतिरिवाजानुसार चालू राहील. हा गुरुद्वारा ज्या चमकनी भागात आहे, तिथे शीख धर्माचे संस्थापक गुरू नानकदेखील गेले होते.

गुरुद्वाराचे केअरटेकर रहमान चमकनी म्हणाले की, काल रात्री निशाण साहिब पुन्हा एकदा ऐतिहासिक गुरुद्वारावर पूर्ण आदराने ठेवण्यात आला. त्यांनी पुढे माहिती दिली की, तालिबानी अधिकाऱ्यांनी त्यांच्या सैन्यासह काल संध्याकाळी पुन्हा गुरुद्वाराला भेट दिली. यादरम्यान त्यांनी आपल्या गुरुद्वाराच्या रीतिरिवाजांनुसार काम करण्याविषयी सांगितले. यासोबतच त्यांनी आपल्या उपस्थितीत निशाण साहिब त्वरित लावण्याच्या सूचनाही दिल्या. त्याचवेळी रेहमान चमकानी म्हणाले की, अफगाणिस्तानातील अल्पसंख्याकांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे यासाठी भारत सरकार आणि आंतरराष्ट्रीय समुदायाच्या प्रयत्नांचे ते आणि बाकीचे लोक कौतुक करतात.

निशाण साहिब काढल्याचा भारताकडून निषेध

तालिबानने निशाण साहिब काढल्याचा भारताने शुक्रवारी निषेध केला. त्याच वेळी त्यांनी आपल्या दृढ विश्वासाचा पुनरुच्चार केला की, अफगाणिस्तानचे भविष्य असे असावे जेथे अल्पसंख्याक आणि महिलांसह अफगाण समाजातील सर्व घटकांचे हित सुरक्षित राहील. याआधीही भारताने युद्धग्रस्त अफगाणच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे आणि अफगाणिस्तानातील या भागात कायमस्वरूपी शांतता महत्त्वाची असल्याचे सांगत शांततेचे आवाहन केले आहे. भारताने अफगाणिस्तानच्या विकासासाठी शांततापूर्ण संवादाच्या मार्गावर भर दिला आहे. याशिवाय अफगाणिस्तानातील शांततेचा मुद्दा संयुक्त राष्ट्रातही चर्चेत आला आहे.

शीख समुदाय दहशतवाद्यांकडून लक्ष्य

अफगाणिस्तानमध्ये राहणारे शीख बऱ्याच काळापासून दहशतवाद्यांचे लक्ष्य झालेले आहेत. गेल्या वर्षी अफगाणिस्तानातील हिंदू आणि शीख समाजाचे नेते निदान सिंह सचदेवा यांचे तालिबान्यांनी एका गुरुद्वारामधून अपहरण केले होते. सचदेव यांचे 22 जून 2020 रोजी पखतिया प्रांतात अपहरण करण्यात आले. यानंतर अफगाणिस्तान सरकार आणि समाजातील ज्येष्ठांनी केलेल्या प्रयत्नांनंतर त्यांना सोडण्यात आले. त्याच वेळी गेल्या वर्षी 25 मार्च रोजी काबुलमधील प्रार्थनास्थळावर इस्लामिक स्टेटने केलेल्या दहशतवादी हल्ल्यात शीख समुदायाचे सुमारे 30 सदस्य मारले गेले. 2020 पर्यंत अफगाणिस्तानमध्ये सुमारे 650 शीख होते.

Afghanistan Sikh religious flag restored at Gurdwara Thala Sahib in Paktia Chamkani area

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात