जालना: भाजपचे शिवराज नारियलवाले यांना न्याय ; अमानुष मारहाण पोलिसांना भोवली ; भाजप आक्रामक झाल्याने PSI सह ५ पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन


  • Jalna: Justice to BJP’s Shivraj Nariyalwale; Inhuman beatings surround police; Suspension of 5 police personnel including PSI due to BJP’s aggression

विशेष प्रतिनिधी

जालना :  भापजच्या युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियलवाले यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर सर्व स्तरावरून व्हिडिओतील पोलिसांचा निषेध होऊ लागला. शिवराज नारियलवाले यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घटनेची वस्तुस्थिती मांडणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आणि दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती.यावरून भाजप आक्रमक झाली होती .Jalna: Justice to BJP’s Shivraj Nariyalwale; Inhuman beatings surround police; Suspension of 5 police personnel including PSI due to BJP’s aggression

अखेर व्हिडिओतील पोलीस उपनिरीकासह ५ जणांचे निलंबन झाले आहे. यासंदर्भातील कारवाई जालना जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी केली आहे.

भाजप आक्रामक झाल्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर एक प्रकारचा दबाव आला होता. व्हिडिओतील प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यासाठी  पोलीस अधीक्षकांनी अप्पर पोलीस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली.

शुक्रवारी अप्पर पोलीस अधीक्षकांनी पोलीस अधीक्षकांना चौकशीचा अहवाल दिला. त्यानंतर याप्रकरणी ५ पोलिसांना निलंबित करण्याचा आदेश देण्यात आला. यामध्ये पोलीस उपनिरीक्षकासह ५ पोलीस कॉस्टेबलचा समावेश आहे.

दरम्यान आता हाच अहवाल औरंगाबादमधील आयजींकडे देण्यात येणार आहे. त्यानंतर आज देखील याप्रकरणी औरंगाबाद परिक्षेत्राचे महानिरीक्षक व्हिडिओमध्ये जे इतर अधिकारी दिसत आहेत. ते म्हणजे अट्रोसिटीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी तक्रारदाराकडून २ लाखांची लाच घेणारे निलंबित डीवायएसपी सुधीर खिरडकर आणि पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्याबाबत देखील निर्णय होऊ शकतो.

या प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारीच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं. शिवराज नारीयलवाले यांना हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली म्हणून मारहाण केल्याचं सांगण्यात आलं होतं.

पण पोलिस करत असलेल्या शिविगाळीचं मोबाईलमध्ये रेकॉर्डींग केलं म्हणून पोलिसांनी त्यांच्यावर राग काढल्याचं फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात सांगितलं होतं. तसंच या सर्वांवर कठोर कारवाईची मागणीही मुख्यमंत्र्यांकडे फडणवीस यांनी केली होती.

अखेर भाजप नेत्यांसह सर्वांच्या या मागणीला यश आलं. जालन्याच्या पोलिस अधीक्षकांनी या प्रकरणी सहा पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक भागवत कदम, पोलिस कर्मचारी सोमनाथ लहानगे, नंदकिशोर ढाकणे, सुमित सोळंके, महेंद्र भारसाकळे यांचा समावेश आहे.

 

Jalna: Justice to BJP’s Shivraj Nariyalwale; Inhuman beatings surround police; Suspension of 5 police personnel including PSI due to BJP’s aggression

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात