प्रतिनिधी
मुंबई : कॉँग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या २०१४ च्या पराभवास जलसंपदा विभागातील गैरव्यवहाराचे आरोप कारणीभूत असल्याचे मानले जात होते. मात्र, तरीही या मलईदार खात्याबाबत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रेम कायमच राहिल्याने महाविकास आघाडीमध्ये मतभेदांची ठिणगी पडली आहे. जलसंपदा विभाग सचिवाच्या नियुक्ती प्रकरणावरून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शरद पवार यांच्याकडे तक्रार केली आहे. Irigation department sparks the differences in the Mahavikas AghadiUddhav Thackeray complains to Sharad Pawar
जलसंपदा विभागाच्या सचिवांच्या नियुक्तीवरुन मंत्रिमंडळ बैठकीत वाद झाले. या दादागिरीची तक्रार मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे नाराजी व्यक्त केलीय. जलसंपदा विभागाच्या कामात घाईगडबडीत निर्णय घ्यायला लावू नका, असे मुख्यमंत्र्यांनी पवारांकडे व्यक्त केली आहे.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनंही मुख्यमंत्र्यांवर पलटवार केलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीप्रमाणे प्रशासनाला हाताशी धरुन राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य करु पाहत असल्याचा आरोप केला जात आहे. सचिव सीताराम कुंटे यांना पदावरुन हटवून, त्यांच्या जागी प्रवीण परदेशी यांची नेमणूक करावी, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी आहे. सरकार अंतर्गत सुरु असलेल्या या घडामोडींमुळे मुख्यमंत्री प्रचंड अस्वस्थ आहे.
फडणवीस सरकारच्या आधी आघाडी सरकारमध्ये जलसंपदा विभागातील भ्रष्टाचारावरुन सरकारला पायउतार होण्याची वेळ आली होती. त्यामुळे आपल्या सरकारच्या काळात किंवा आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात असा कुठलाही डाग लागू नये, याची खबरदारी मुख्यमंत्री घेत आहेत
मंत्रिमंडळाची चर्चा बाहेर सांगू नये अशी प्रथा आहे. मी याबाबत काही भाष्य करणार नाही. मला जे काही बोलायचं आहे ते आवश्यकता असेल तर मी मुख्यमंत्र्यांशी बोलेल. कामकाज करत असताना नाराजी धरायची नसते. त्या त्या वेळी तो तो विषय असतो. त्यामुळे कामाबाबत नाराजीची गरज नाही, असे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App