International Emmy Awards २०२१ : २४ देशांतील ४४ नामांकित स्टार्स सहभागी ; नवाजुद्दीन सिद्दीकी, वीर दास आणि सुष्मिता सेनच्या हाती निराशा , पुरस्कारापासून दूर

यावर्षी २३ सप्टेंबर रोजी या पुरस्कारांसाठी नामांकने जाहीर करण्यात आली होती. यामध्ये २४ देशांतील ४४ नामांकित स्टार्स सहभागी झाले होते.International Emmy Awards 2021: 44 nominated stars from 24 countries; Disappointment at the hands of Nawazuddin Siddiqui, Veer Das and Sushmita Sen, away from the award


विशेष प्रतिनिधी

मुंबई : २२ नोव्हेंबर रोजी न्यूयॉर्क शहरात आयोजित समारंभात २०२१ च्या आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली.यावर्षी २३ सप्टेंबर रोजी या पुरस्कारांसाठी नामांकने जाहीर करण्यात आली होती. यामध्ये २४ देशांतील ४४ नामांकित स्टार्स सहभागी झाले होते.न्यूयॉर्कमधील या आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार २०२१ यामध्ये भारताला पुरस्काराची खूप आशा होती. मात्र यावेळी भारताला एकही पुरस्कार न मिळाल्याने चाहत्यांची निराशा झाली आहे.

ट्रॉफीसाठी चुरस रंगली

नवाजुद्दीन, सुष्मिता आणि वीर दास यांना एकही विजय मिळाला नसला, तरी भारताला त्यांचा खूप अभिमान आहे.अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी, वीर दास आणि सुष्मिता सेन यांना वेगवेगळ्या श्रेणींमध्ये नामांकन मिळाले होते. यावेळी त्यांनी फ्रान्स आणि स्कॉटलंडसारख्या देशांना तगडी स्पर्धा केली आणि या ट्रॉफीसाठी चुरस रंगली होती.आंतरराष्‍ट्रीय एमी अवॉर्ड्समध्‍ये नवाजुद्दीन सिद्दीकीला ‘सिरीयस मॅन’मधील अभिनयासाठी सर्वोत्‍कृष्‍ट अभिनेत्यासाठी नामांकन मिळाले होते. मात्र, स्कॉटिश अभिनेता डेव्हिड टेनंट याने या श्रेणीत ट्रॉफी आपल्या नावावर केली. दुसरीकडे, वीर दासचा शो बेस्ट कॉमेडी कॅटेगरीत मागे पडला आहे. वीरला मात देत, हा पुरस्कार ‘कॉल माय एजंट’ या हिट फ्रेंच शोला मिळाला आहे.

‘आर्य’ला इस्रायली प्रोडक्शन तेहरानने केले पराभूत

सुष्मिता सेनच्या ‘आर्या’ला सर्वोत्कृष्ट नाटक विभागात नामांकन मिळाले होते. सुष्मिताच्या या मालिकेकडून चाहत्यांना खूप आशा होत्या.मात्र ‘आर्य’ला इस्रायली प्रोडक्शन तेहरानने पराभूत केले. नवाजुद्दीन दुसऱ्यांदा इंटरनॅशनल एमी अवॉर्ड्समध्ये सहभागी झाला होता. याआधी ‘सेक्रेड गेम्स’ आणि ‘मॅकमाफिया’चा दबदबा होता.

लोकांनी मला खूप प्रेम दिले

एमी अवॉर्ड्समध्ये नॉमिनेट झाल्याबद्दल नवाजुद्दीन एका मुलाखतीत सांगितले की, ‘सिरीयस मॅनसाठी नामांकन मिळाल्याने मी खूप आनंदी आहे .परंतु मी पुरस्कार जिंकण्यासाठी कोणत्याही उंदीरांच्या शर्यतीचा भाग नाही. लोकांनी मला खूप प्रेम दिले आणि मला या श्रेणीत नामांकन मिळाले ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे.’

International Emmy Awards 2021: 44 nominated stars from 24 countries; Disappointment at the hands of Nawazuddin Siddiqui, Veer Das and Sushmita Sen, away from the award