इराण – अमेरिका युद्धात भारताचे मध्यस्थीचे “डेकोरेशन” नाही; पण भारताची इराणला वैद्यकीय मदतीची दुसरी खेप रवाना!!

Iran-US war

नाशिक : इराण आणि अमेरिका यांच्या युद्धात भारताने उगाच मध्यस्थीचे “डेकोरेशन” केले नाही, पण मानवतेच्या दृष्टिकोनातून इराणला वैद्यकीय मदत पाठवायला सुद्धा हात आखडता घेतला नाही. भारताने वैद्यकीय मदतीची दुसरी घेत आज इराणला रवाना केली.India’s mediation in the Iran-US war is not a “decoration”; but India’s second consignment of medical aid is sent to Iran!!

– पाकिस्तानी राज्यकर्त्यांचा शांतिदूताचा बुरखा

इराण आणि अमेरिका यांच्या युद्धात पाकिस्तानने मध्यस्थीचे भरपूर डेकोरेशन केले. संपूर्ण जगात दहशतवाद निर्यात करणाऱ्या पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी शांतिदूताचा सभ्यतेचा बुरखा पांघरला. इराणी आणि अमेरिकन शिष्टमंडळांचे स्वागत करताना त्यांना सगळा जागतिक प्रोटोकॉल दिला. या दोन्ही शिष्टमंडळाचे स्वागत करण्यासाठी पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार आणि स्वयंघोषित फिल्ड मार्शल असीम मुनीर हे दोघेही त्यांच्या होत्या – नव्हत्या तेवढ्या ताफ्यासह विमानतळावर हजर राहिले. अमेरिकन आणि इराणी शिष्टमंडळांना या दोघांनी वाजत गाजत इस्लामाबाद मध्ये आणले. अमेरिकन आणि इराणी शिष्टमंडळाच्या विमानांना पाकिस्तानी हवाई दलाच्या विमानांनी संरक्षण देण्याचा आव आणला. पाकिस्तानने या दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांना पाकिस्तानातल्या सगळ्यात मोठ्या स्टार हॉटेलमध्ये उतरविले. पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी हे सगळे डेकोरेशन सगळ्या जगाला दाखविले.



– इस्लामाबाद मध्ये लॉकडाऊन

अमेरिकन आणि इराणी शिष्टमंडळाच्या चर्चेत प्रत्यक्ष काय व्हायचे ते होवो, आपले डेकोरेशन कमी पडता कामा नये, याची पूर्ण “दक्षता” पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी घेतली. त्यासाठी त्यांनी अख्खी इस्लामाबादची राजधानी दोन दिवसांच्या लॉकडाऊन मध्ये ढकलली, पण एवढे करूनही इराण आणि अमेरिका यांच्यातली चर्चा यशस्वी करण्याची कुठलीही गॅरंटी पाकिस्तानी राज्यकर्ते घेऊ शकले नाहीत.

– भारताची इराणला दुसऱ्यांदा वैद्यकीय मदत

त्या उलट भारताने अमेरिका आणि इराण यांच्यातल्या युद्धात बिलकुल मध्यस्थीचे डेकोरेशन केले नाही. पण इराणी जनतेला वैद्यकीय मदत देताना भारताने हात आखडता घेतला नाही. भारताने आजच वैद्यकीय मदतीची दुसरी खेप इराणला रवाना केली. यामध्ये विविध वैद्यकीय अत्यावश्यक सामग्रीचा समावेश केला. भारताने अशाच वैद्यकीय मदतीची पहिली खेप इराणला 18 मार्चला पाठवली होती. इराणच्या भारतातल्या राजदूतांनी या वैद्यकीय मदतीबद्दल खास व्हिडिओद्वारे आभार मानले.

India’s mediation in the Iran-US war is not a “decoration”; but India’s second consignment of medical aid is sent to Iran!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात