पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या आत्मनिर्भर भारत योजनेसेह विविध योजनांमुळे भारत २०३० पर्यंत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनणार असल्याचा अंदाज सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्चने आपल्या वार्षिक रिपोर्टमध्ये व्यक्त केला आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या आत्मनिर्भर भारत योजनेसेह विविध योजनांमुळे भारत २०३० पर्यंत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनणार असल्याचा अंदाज सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्चने आपल्या वार्षिक रिपोर्टमध्ये व्यक्त केला आहे. India will become the third largest economy by 2030
सध्या भारत सहाव्या नंबरवर आहे. 2025 मध्ये भारत जगातील 5 वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारा देश बनेल. तर 2030 मध्ये तो तिसऱ्या क्रमांकावर झेपावेल. 2019 मध्ये इंग्लंडला मागे टाकत भारत पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारा देश बनला होता. मात्र, चीनी व्हायरसचा फटका आणि डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झाल्याने भारत सहाव्या नंबरवर पोहोचला आहे.
चीनी व्हायसचे संकट संधीत रुपांतरीत करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विविध योजना राबविल्या. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येणार आहेत. त्यामुळे 2025 मध्ये भारताचा वार्षिक वाढीचा दर 5.8% असेल. या वाढीमुळे 2030 पर्यंत भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल. येथे पोहोचण्यासाठी भारत युके, जर्मनी आणि जपानला मागे टाकेल. डॉलरच्या बाबतीत जपान तिसऱ्या क्रमांकावर राहील. मात्र, 2030 मध्ये ते पाचव्या क्रमांकावर घसरू शकते.
यंदाच्या वर्षी दुसऱ्या तिमाहीत देशाची अर्थव्यवस्था 7.5 टक्केने घसरली होती. पहिल्या तिमाहीत 23.9% नी घट झाली होती. मात्र, याच वेळी सरकारने सुमारे 29 लाख कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर केले. त्याचा अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम झाला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App