100 व्या किसान रेल्वेला पंतप्रधान दाखवणार हिरवा झेंडा; महाराष्ट्र – पश्चिम बंगालदरम्यान धावणार गाडी


महाराष्ट्रातील सांगोला ते पश्चिम बंगालमधील शालिमार या दरम्यान धावणारी ही किसान रेल्वे कृषी उत्पादनांच्या वाहतुकीसाठी गेम चेंजर ठरणार आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली :  कृषी उत्पादनांची वाहतूक करण्याऱ्या 100 व्या किसान रेल्वेस पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार आहेत. 28 डिसेंबर रोजी संध्याकाळी 4.30 वाजता हा कार्यक्रम व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पार पडणार आहे. या वेळी पंतप्रधानांसोबत रेल्वे मंत्री पियूष गोयल आणि कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर उपस्थित राहणार आहेत. Prime Minister to show green flag to 100th Kisan Railway

महाराष्ट्रातील सांगोला ते पश्चिम बंगालमधील शालिमार या दरम्यान धावणारी ही किसान रेल्वे कृषी उत्पादनांच्या वाहतुकीसाठी गेम चेंजर ठरणार आहे. ही किसान रेल्वे देशातील 100 वी किसान रेल्वे असणार आहे.

मल्टी-कमोडिटी ट्रेन असणाऱ्या या गाडीच्या माध्यमातून फ्लॉवर, शिमला मिर्ची, कोबी, ड्रमस्टिक, मिर्ची, कांदा यासारख्या भाज्यांची वाहतूक केली जाणार आहे. तसेच जांभूळ, संत्री, केळी तसेच इतर काही फळांचीही वाहतूक करण्यात येणार आहे. या गाडीमध्ये नाशवंत कृषी उत्पादनांच्या वाहतूकीला परवानगी देण्यात आली आहे. भारत सरकारने फळे आणि भाज्यांच्या वाहतूकीसाठी 50% अनुदान जाहीर केले आहे.

Prime Minister to show green flag to 100th Kisan Railway

किसान रेल्वेची सुरुवात 7 ऑगस्ट 2020 रोजी करण्यात आली आहे. पहिली गाडी देवळाली ते दानापूर या दरम्यान सुरू झाली. नंतर याचा मार्ग मुझफ्फरपूरपर्यंत वाढवण्यात आला. या गाडीला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने याच्या फेऱ्या आठवड्यातून तीन वेळा वाढवण्यात आल्या. किसान रेल्वे देशभरातील कृषी उत्पादनाच्या वाहतूकीमध्ये एक महत्वाची भूमिका पार पाडत आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण