गाय बचाओ’ पदयात्रा काढणार, पण स्वत: प्रियंका गांधी मात्र सहभागी नाही होणार


उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसकडे काहीच मुद्दा नसल्याने आता प्रियंका गांधी-वड्रा यांनी गाय बचाव, किसान बचाव, नावाने पदयात्रा काढण्याची घोषणा केली आहे. मात्र, या पदयात्रेत स्वत: प्रियंका गांधीच सहभागी होणार नाही.

विशेष प्रतिनिधी

लखनऊ : उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसकडे काहीच मुद्दा नसल्याने आता प्रियंका गांधी-वड्रा यांनी गाय बचाव, किसान बचाव नावाने पदयात्रा काढण्याची घोषणा केली आहे. मात्र, या पदयात्रेत स्वत: प्रियंका गांधीच सहभागी होणार नाही. ‘Save the Cow’ will run, but Priyanka Gandhi will not participate

उत्तर प्रदेशात कॉंग्रेसचा पाया पूर्णपणे उखडला आहे. त्यामुळे काहीतरी करण्यासाठी कॉंग्रेसची धडपड आहे. उत्तर प्रदेश कॉंग्रेसच्या प्रभारी प्रियंका गांधी यांनी गोरक्षा हा मुद्दा हाती घेतला आहे. यासाठी बुंदेलखंडातील ललितपूर ते चित्रकूटपर्यंत गाय बचाओ, किसान बचाओ यात्रा काढण्यात येणार आहे. मात्र, या पदयात्रेचे नेतृत्व उत्तर प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अजयकुमार लल्लू आणि माजी केंद्रीय मंत्री प्रदीप जैन करणार आहेत. प्रियंका गांधी स्वत: मात्र त्यामध्ये सहभागी होणार नाहीत.

गोरक्षा या विषयाला कॉंग्रेसचा कायमच विरोध राहिला आहे. मात्र, प्रियंका यांच्या आजी आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे जुने निवडणूक चिन्ह गाय-वासरू होते. त्यावेळी गोहत्या बंदी कायदा करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, इंदिरा गांधी यांनी ती मान्य केली नाही.

‘Save the Cow’ will run, but Priyanka Gandhi will not participate

याच्या उलट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने गोरक्षेसाठी अनेक पावले उचलली आहे. योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारद्वारा चालविल्या जाणाऱ्या गोशाळांमध्ये ५ लाख गायी आहेत. याशिवाय स्थानिक प्रशासन आणि समाजाच्य सहाय्याने चालविल्या जाणाऱ्या गोशाळांमध्ये आठ लाख गायी आहेत. त्याचबरोबर सरकारने निराधित गोवंश सहभागिता स्किम सुरू केली आहे. यामध्ये एक भटकी गाय दत्तक घेणाऱ्याला प्रति महिना सरकारकडून नऊशे रुपये दिले जाणार आहेत.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण