विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन – भारत हा जगातील सर्वांत मोठा लस उत्पादक देश आहे. तसेच, विकसनशील देशांना लसपुरवठा करण्यातही भारत अव्वल आहे. भारतात रुग्णसंख्येत वेगाने वाढ झाल्याने सरकार साहजिकच आपल्या नागरिकांना अधिक प्राधान्य देण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारताला देशांतर्गत वापरासाठी अधिक लशींची आवश्ययकता पडणार असून त्याचा परिणाम जागतिक लसपुरवठ्यावर होऊ शकतो, अशी शक्यता ‘ग्लोबल अलायन्स फॉर व्हॅक्सीन अँड इम्युनायझेनश’ने (गॅवी) वर्तविली आहे. India is lucky country in the world in terms of vaccination
तर संसर्गाच्या या संकटकाळात लस उत्पादनाची सर्वाधिक क्षमता असलेली सीरम इन्स्टिट्यूट भारतात असल्याने हा देश भाग्यवान ठरत असल्याचे मत जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी नोंदविले आहे. ते म्हणाले. रुग्णसंख्या वाढत असली तरी भारतात लसीकरणाला वेग येत असल्याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले.
जगभरातील एकूण स्थिती पाहता मार्च आणि एप्रिल या महिन्यांत भारताकडून नऊ कोटी लशींचे डोस मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, भारतातील रुग्णसंख्येतील वाढ पाहता अपेक्षेपेक्षा कितीतरी कमी डोस मिळतील. तरीही आशेचा दुसरा एक किरण निर्माण झाला आहे. अनेक श्रीमंत देशांनी त्यांच्याकडील लोकसंख्येपेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात लस विकत घेतली असल्याने ते उर्वरित लशींचा साठा इतर जगासाठी उपलब्ध करून देतील, अशी आशा आहे. त्यांनी मदत केल्यास जागतिक लसीकरण मोहिमेला मोठे बळ मिळेल,’ असे गॅवीचे सीईओ बर्कले यांनी सांगितले.
इतर बातम्या वाचा…
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App