महाराष्ट्र कोरोनाविरोधी लसीकरणात अव्वल , 80 लाखांहून अधिक जणांना डोस ; दररोज 4 लाख जणांचे लसीकरण सुरू


वृत्तसंस्था

मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणामध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर असून 80 लाखांहून अधिक जणांना लस दिली आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता लसीकरणाला अधिक वेग येण्यासाठी केंद्राने लसींचा पुरवठा करावा, अशा सूचना मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिल्या.Maharashtra leads in anti-corona vaccination Dose 80 million people Vaccination of 4 lakh people started every day

कोरोना लसीकरणासंदर्भात नियोजन व समन्वयासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या राज्य सुकाणू समितीची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य सचिवांनी लसीकरणाचा आढावा घेतला.शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव ओ.पी.गुप्ता आदी यावेळी उपस्थित होते.

आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. व्यास म्हणाले, महाराष्ट्रात एक कोटी सहा लाख डोस प्राप्त झाले असून त्यापैकी 88 लाख डोस दिले आहेत. डोस वाया जाण्याचे प्रमाण तीन टक्के आहे. ते अत्यंत कमी असून राष्ट्रीय सरासरीच्या निम्मे आहे. 5 एप्रिलपर्यंत 81 लाख 21 हजार 332 नागरिकांना लस दिली. दररोज 4 लाख जणांना लस दिली जात आहे.

लसीकरणाचा वेग अधिक वाढविण्याच्या सूचना केल्या. 45 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाची सरासरी 12.3 टक्के असून भंडारा, कोल्हापूर, नागपूर, मुंबई, पुणे, सांगली, गोंदिया, वाशिम आणि वर्धा या जिल्ह्यांनी सरासरीपेक्षा अधिक लसीकरण केले आहे.

औरंगाबाद, पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, ठाणे या सहा जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या जास्त आहे. येथे 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरणसाठी प्रयत्न करावेत

Maharashtra leads in anti-corona vaccination Dose 80 million people Vaccination of 4 lakh people started every day

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती