India will host 2026 t20 world cup : ICC ने 2024 ते 2031 दरम्यान T20 विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि विश्वचषक स्पर्धेच्या यजमानांची घोषणा केली आहे. या अंतर्गत भारतात तीन मोठ्या स्पर्धा होणार आहेत. भारत 2026 मध्ये श्रीलंकेसोबत टी-20 विश्वचषक आयोजित करणार आहे. त्याच वेळी 2029 मध्ये, ते स्वतःच चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करेल. ICC events host nations as India will host 2026 t20 world cup 2029 champions trophy and 2031 world cup
वृत्तसंस्था
मुंबई : ICC ने 2024 ते 2031 दरम्यान T20 विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि विश्वचषक स्पर्धेच्या यजमानांची घोषणा केली आहे. या अंतर्गत भारतात तीन मोठ्या स्पर्धा होणार आहेत. भारत 2026 मध्ये श्रीलंकेसोबत टी-20 विश्वचषक आयोजित करणार आहे. त्याच वेळी 2029 मध्ये, ते स्वतःच चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करेल. त्याचबरोबर भारत आणि बांगलादेश 2031 मध्ये विश्वचषक एकत्र आयोजित करतील. आयसीसीने म्हटले आहे की 14 विविध देश या स्पर्धेचे आयोजन करतील.
यासोबतच चॅम्पियन्स ट्रॉफीचेही पुनरागमन होत आहे. ही स्पर्धा शेवटची 2017 मध्ये खेळली गेली होती. तेव्हापासून त्याच्या भविष्यावर संकटाचे ढग घिरट्या घालत होते. पण आयसीसीने पाकिस्तान आणि भारताचे यजमानपद देऊन भविष्यातही ही स्पर्धा खेळवली जाईल, असे ठरवले आहे.
आयसीसी 2024 ते 2031 या कालावधीत दरवर्षी मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करेल. या अंतर्गत अमेरिकेत प्रथमच आयसीसीची मोठी स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. 2024 टी-20 विश्वचषक येथे होणार आहे. अमेरिकेबरोबरच वेस्ट इंडिजही याचे सह-यजमानपद भूषवणार आहे. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानला देण्यात आले होते. जवळपास 29 वर्षांनंतर तिथे आयसीसीचा कार्यक्रम होणार आहे. 1996 च्या विश्वचषकात पाकिस्तानमध्ये शेवटचे सामने खेळले गेले होते. ही स्पर्धा भारत, श्रीलंका आणि पाकिस्तानने संयुक्तपणे आयोजित केली होती. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख रमीझ राजा यांनी यजमानपदावर आनंद व्यक्त केला.
Are you ready for the best-ever decade of men’s white-ball cricket? Eight new tournaments announced 🔥14 different host nations confirmed 🌏Champions Trophy officially returns 🙌https://t.co/OkZ2vOpvVQ pic.twitter.com/uwQHnna92F — ICC (@ICC) November 16, 2021
Are you ready for the best-ever decade of men’s white-ball cricket?
Eight new tournaments announced 🔥14 different host nations confirmed 🌏Champions Trophy officially returns 🙌https://t.co/OkZ2vOpvVQ pic.twitter.com/uwQHnna92F
— ICC (@ICC) November 16, 2021
आयसीसीच्या वेळापत्रकानुसार, २०२४ टी२० विश्वचषक, २०२६ टी२० विश्वचषक, २०२७ विश्वचषक, २०२८ टी२० विश्वचषक, २०३० टी२० विश्वचषक आणि २०३१ विश्वचषक स्पर्धांमध्ये एकापेक्षा जास्त यजमान देश असतील. आयसीसीच्या वेळापत्रकानुसार,
2024 T20 विश्वचषक – वेस्ट इंडिज आणि अमेरिका 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी – पाकिस्तान 2026 T20 विश्वचषक – भारत आणि श्रीलंका 2027 विश्वचषक – दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया 2028 T20 विश्वचषक – ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड 2029 चॅम्पियन्स ट्रॉफी – भारत 2030 T20 विश्वचषक – इंग्लंड, आयर्लंड आणि स्कॉटलंड 2031 विश्वचषक – भारत आणि बांगलादेश
प्रथमच, अमेरिका, नामिबिया, आयर्लंड आणि स्कॉटलंडमध्ये मोठ्या ICC स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. त्याचबरोबर आयसीसीची स्पर्धा बऱ्याच दिवसांनी दक्षिण आफ्रिकेत खेळवली जाणार आहे.
ICC events host nations as India will host 2026 t20 world cup 2029 champions trophy and 2031 world cup
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App