वृत्तसंस्था
नवी दिल्ली – कोरोना प्रतिबंधक लसीची मागणी वाढत असताना एका पेक्षा अधिक लस उत्पादकांना सरकारने परवानगी द्यावी, अशी सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल एका बैठकीत केली होती. प्रत्यक्षात त्यांची सूचना येण्यापूर्वीच केंद्र सरकारने १२ कंपन्यांना लस उत्पादनाची परवानगी दिली आहे. मात्र, या बाबीची आपल्याला भाषणापूर्वी कल्पना नव्हती, असा खुलासा नितीन गडकरी यांनी केला आहे. I was unaware that before my speech Minister for Chemical & Fertilizers Mansukh Mandaviya had explained govt’s efforts to ramp up vaccine production
गडकरी यांच्या भाषणापूर्वी केंद्रीय रसायन आणि खतमंत्री मनसुख मांडविया यांनी केंद्र सरकार लस उत्पादन वाढविण्यासाठी कोणते प्रयत्न करते आहे, याची सविस्तर माहिती दिली होती. त्यात १२ कंपन्यांना लस उत्पादनाची परवानगी दिल्याची देखील माहिती होती. पण गडकरींनी ती माहिती ऐकली नाही. लस उत्पादन वाढविण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या सूचना सरकारला केल्या.
आज त्यांच्या भाषणाला २४ तास उलटून गेल्यानंतर गडकरी यांनी या सूचनांबाबत खुलासा केला आहे. मंत्री मनसुख मांडविया यांनी मला बैठकीनंतर सरकारच्या प्रयत्नांची माहिती दिली. त्यात १२ कंपन्यांच्या प्लँटसंबंधीचीही माहिती होती, असे गडकरी यांनी स्पष्ट केले. कोरोना प्रतिबंधक लसीची मागणी वाढत असताना रसायन मंत्रालय योग्य दिशेने चालले आहे. मंत्र्यांचे आणि अधिकाराऱ्यांचे प्रयत्न प्रशंसनीय आहेत, हे रेकॉर्डवर आणावेसे वाटले म्हणून आपण हा खुलासा करीत असल्याचे नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.
Y'day while participating at the conference, I had made a suggestion to ramp up vaccine production. I was unaware that before my speech Minister for Chemical & Fertilizers Mansukh Mandaviya had explained govt’s efforts to ramp up vaccine production: Union Minister Nitin Gadkari pic.twitter.com/CvomcR7y47 — ANI (@ANI) May 19, 2021
Y'day while participating at the conference, I had made a suggestion to ramp up vaccine production. I was unaware that before my speech Minister for Chemical & Fertilizers Mansukh Mandaviya had explained govt’s efforts to ramp up vaccine production: Union Minister Nitin Gadkari pic.twitter.com/CvomcR7y47
— ANI (@ANI) May 19, 2021
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App