नवीन प्रायव्हसी पॉलिसी मागे घेण्याची केंद्राची व्हॉटसअ‍ॅपला सूचना, अन्यथा कारवाईचा इशारा


व्हॉटसअ‍ॅपने नवीन प्रायव्हसी पॉलिसी मागे घेण्याच्या स्पष्ट सूचना केंद्र सरकारने व्हॉटसअ‍ॅप कंपनीला दिल्या आहेत. यासाठी सात दिवसांचा अवधी दिला असून अन्यथा कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.  Center notifies WhatsApp to withdraw new privacy policy, warning of action otherwise

प्रतिनिधी

नवी दिल्ली: व्हॉटसअ‍ॅपने नवीन प्रायव्हसी पॉलिसी मागे घेण्याच्या स्पष्ट सूचना केंद्र सरकारने व्हॉटसअ‍ॅप कंपनीला दिल्या आहेत. यासाठी सात दिवसांचा अवधी दिला असून अन्यथा कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.
व्हॉटसअ‍ॅपने जारी केलेल्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीवरून  दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि व्हॉट्सअ‍ॅकडे उत्तर मागितले होते. त्यामुळे व्हॉटसअ‍ॅपने नवे धोरण मागे घ्यावे अशा सूचना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिल्या आहेत.  उत्तर देण्यासाठी केंद्र सरकारने व्हॉट्सअ‍ॅपला ७ दिवसांचा अवधी दिला आहे. त्यामुळे २५ मेपर्यंत व्हॉट्सअ‍ॅपला सरकारकडे बाजू मांडावी लागेल. व्हॉट्सअ‍ॅपने उत्तर न दिल्यास आम्ही आवश्यक ती पावलं उचलू, असं सरकारनं म्हटलं आहे.
 माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं १८ मे रोजी व्हॉट्सअ‍ॅपला एक पत्र पाठवले आहे. १५ मेपासून व्हॉट्सअ‍ॅपची नवी प्रायव्हसी पॉलिसी लागू झाली आहे.  यासंदर्भात व्हॉट्सअ‍ॅपने स्वत:ची बाजू मांडली आहे. वापरकर्त्यांनी नवे धोरण स्वीकारले नाही तर त्यांचे अकाऊंट बंद करण्यात येणार नाही. मात्र हळूहळू त्यांना मिळणाऱ्या  सुविधा बंद होतील,अशी माहिती व्हॉट्सअ‍ॅपने दिली आहे. या नव्या मोडमुळे यूजर्सला कॉल येणे बंद होईल. येणाऱ्या  मेसेजला उत्तर देता येणार नाही.

Center notifies WhatsApp to withdraw new privacy policy, warning of action otherwise

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात