CycloneTauktae Positive news : चक्रीवादळात कोसळलेल्या वृक्षात अडकेल्या पोपटांची सुखरूप सुटका आणि वैद्यकीय मदत… कुठे घडलेय वाचा…


वृत्तसंस्था

अमरेली – CycloneTauktae चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपूर बातम्या येत असताना एक सकारात्मक बातमीही आली आहे. चक्रीवादळ आणि प्रचंड पावसामुळे कोसळलेल्या एका मोठ्या वृक्षाच्या फांद्यांमध्ये अडकेल्या पोपटांची सुखरूप सुटका करून त्यांना वैद्यकीय मदत देण्यात आल्याची घटना गुजरातच्या अमरेलीमध्ये घडली आहे. Locals in Amreli rescued parrots & other birds as trees uprooted due to heavy rain & wind as a result of CycloneTauktae

अमरेलीतील एका कॉलनीतील एका मोठ्या वृक्षावरील नैसर्गिक अधिवासात अनेक पोपटांचा निवास होता. चक्रीवादळात हा वृक्ष कोसळला. त्यात पोपटांचा नैसर्गिक अधिवासही नष्ट झाला. काही पोपटांचा मृत्यू झाला. पण बरेसचे पोपट वाचले होते आणि वृक्षांच्या फांद्यांमध्ये अडकून जखमी झाले होते. स्थानिक पक्षीमित्रांच्या मदतीने काही नागरिकांनी या पोपटांची सुटका केली आणि त्यांना तातडीची वैद्यकीय मदत तसेच अन्न पाणी पुरविले.

सध्या या पोपटांना अमरेलीच्या पोलीस लाइन्समध्ये सुरक्षित ठेवण्यात आले आहे. सगळे पोपट बरे झाल्यावर तसेच वादळाची तीव्रता कमी होऊन वातावरण सामान्य झाल्यावर सगळ्या पोपटांना नैसर्गिक अधिवासात पुन्हा सोडण्यात येईल, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

Locals in Amreli rescued parrots & other birds as trees uprooted due to heavy rain & wind as a result of CycloneTauktae

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात