कलंक मतीचा झडो; हिंदुत्ववादी नेते पवार कुटुंबाकडून काही शिको!!


महाराष्ट्राच्या राजकारणात कलंक या एका शब्दाने जी “कलंकशोभा” वाढवली आहे, त्यामुळे “कलंक मतीचा झडो, सुजन वाक्य कानी पडो” या ऐवजी “कलंक मतीचा झडो, हिंदुत्ववादी नेते पवार कुटुंबाकडून काही शिको!!”, अशा बदल करावा लागला आहे.Hindutva parties should learn not split amongst themselves as pawar family does it rightly

उद्धव ठाकरे यांनी नागपुरात जाऊन देवेंद्र फडणवीस यांना कलंक म्हटले. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात कलंक या शब्दाने थैमान घातले. भाजप आक्रमक झाला. उद्धव ठाकरेही आपला उद्दामपणा सोडायला तयार नाहीत. नितेश राणे त्यांना हिजडा म्हणाले. शिवसेना भाजप मधल्या या टोकाच्या वादामुळेच 25 – 30 वर्षांच्या एकेकाळच्या दोन मित्रांमध्ये मोठी दरी निर्माण झाली. राजकीय मतभेद असू देत. सत्तेच्या वाटपात राजकीय वैर उद्भवू देत. पण दोन हिंदुत्ववाद्यांमधल्या वैराने टोक गाठले आहे. दोघांनाही कसलेच भान राहिले नाही. अशावेळी त्यांनी पवार कुटुंबाकडून काही शिकण्याची वेळ आली आहे.



 पवारांचे राजकारण विश्वासघाताचे, पण…

शरद पवारांचे बाकीचे राजकारण कितीही विश्वासघातकी असो, ते इतर कितीही जणांची कुटुंबे फोडोत. शरद पवार स्वतःच्या कुटुंबावर तशी आंच येऊ देत नाहीत, याची साक्ष गेल्या दोन-तीन दिवसांत महाराष्ट्राला पटली आहे. अजितदादा अख्खा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेऊन शिंदे – फडणवीस सरकारला सामील झाले. पण त्यानंतरही राष्ट्रवादीतील फुटीचे पडसाद आपल्या कुटुंबात उमटू नयेत म्हणून पवार कुटुंब विशेषतः शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे आवर्जून “काळजी” घेत आहेत. एकमेकांना भेटून आणि संपर्कात राहून पवार कुटुंबात फूट पडली हे बाहेर दिसू नये, यासाठी “बांधबंधिस्ती” करत आहेत. हा पवारांचा गुण इतर राजकीय कुटुंबांनी घेण्याची नितांत गरज आहे.

शरद पवारांनी आपल्या कारकीर्दीत महाराष्ट्रातली अनेक राजकीय कुटुंबे फोडली. त्यांच्यातली वैरे अजून बुजली नाहीत. पण पवारांनी स्वतःचे कुटुंब मात्र कधी फुटू दिले नाही. आताही अजितनिष्ठ विरुद्ध शरदनिष्ठ अशा राष्ट्रवादीतच दोन राजकीय वाटा वेगळ्या निर्माण झाल्या असल्या तरी, या वाटा निर्माण होऊन अवघा आठवडा उलटला नाही, तोच पवार कुटुंबात पुन्हा कौटुंबिक डागडुजी सुरू झाली. ज्यावेळी अजितनिष्ठ गटातले लोक थेट शरद पवारांवर शरसंधान साधू लागले, त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी वेळीच “सावध” होत श्रीनिवास पवारांना फोन केला. ते त्यावेळी परदेशात होते. परंतु ते परत भारतात परत आल्यानंतर पवार कुटुंबातल्या एकमेकांच्या भेटीगाठी वाढल्या आणि त्यातून राजकीय दृष्ट्या राष्ट्रवादीचे काय व्हायचे ते होवो, पवार कुटुंब तुटता कामा नये आणि तुटले तरी ते निदान बाहेर दिसता तरी कामा नये, याची “काळजी” पवार कुटुंबाने घेतली.

पवारांच्या राजकारणातून विश्वासघातासारखे अस्त्र न शिकता बाकीच्या नेत्यांनी पवार कुटुंबीयांकडून आपले कुटुंब न तोडण्याचा हा गुण घेतला पाहिजे. महाराष्ट्रात स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या पक्षांनी तर तो आवर्जून शिकला पाहिजे.

एक तर महाराष्ट्रात हिंदुत्ववादी पक्षांना गेल्या 70 वर्षांमध्ये फारसे स्थान नव्हते. ते गेल्या 20 – 25 वर्षांमध्ये निर्माण झाले आहे. त्यासाठी असंख्य कार्यकर्ते राबले आहेत आणि त्यांच्या कष्टावर आजच्या ठाकरे – फडणवीसांना सत्तेची फळे चाखायला मिळाली आहेत. याचा अर्थ ठाकरे किंवा फडणवीस यांच्या कष्टात कमी आहे, असे नाही. पण भांडायचे किती आणि कुठपर्यंत??, याची मर्यादा त्यांना राहिलेली नाही. भाजप आणि शिवसेना हे स्वतःचे पक्ष वाढवण्यासाठी ते विरोधी काँग्रेस विचारसरणीच्या पक्षांची “पॉलिटिकल स्पेस” संपविण्याऐवजी ते हिंदुत्ववादी पक्षांचीच म्हणजेच एकमेकांची “पॉलिटिकल स्पेस” संपवायच्या नादाला लागले आहेत, हा त्यांचा सगळ्यात मोठा दोष आहे.

काँग्रेस – राष्ट्रवादी किंवा काँग्रेसचे विचारसरणीचे कोणतेही पक्ष भले भांडत असतील, अगदी ती भांडणे टोकाला नेत असतील, पण हे पक्ष देशातल्या कुठल्याही राज्यात असोत, ते सत्ता वाटून खाण्यात कुठेही कमी पडत नाहीत. सत्ता वाटून खाण्याची तशी राजकीय चलाखी अजून भाजप किंवा बाकीच्या हिंदुत्ववादी पक्षांना जमलेली नाही. म्हणून ते एकमेकांना “खाऊ की गिळू” असे करत आहेत. त्यातूनच महाराष्ट्रातली “कलंकशोभा” दृश्यमान झाली आहे.

 पश्चातापाची वेळ येऊ देऊ नका

पवारांच्या राजकारणाचे बाकीचे विश्वासघाताचे गुण कोणत्याही पक्षाने घेऊच नयेत. पण निदान राजकारण काय चालायचे ते चालो, पक्षात काय व्हायचे ते होवो, आपले कुटुंब तुटता कामा नये एवढी तरी “काळजी” पवार कुटुंब घेते, ते महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय कुटुंबांनी किंबहुना हिंदुत्ववादी पक्षांमधल्या नेत्यांनी शिकण्याची फार मोठी गरज आहे. अन्यथा हिंदुत्ववादी पक्षांनाच नजीकच्या भविष्यकाळात पश्चाताप करण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही!!

Hindutva parties should learn not split amongst themselves as pawar family does it rightly

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात