दोन डगरींवर हात, झाला घात : प्रशांत किशोर यांचा काँग्रेस प्रवेशाचा डाव उधळला!!


बरेच दिवस करणार – करणार अशा राजकीय हुलकावण्या देणाऱ्या प्रशांत किशोर यांचा काँग्रेस प्रवेशाचा डाव अखेर काँग्रेस हायकमांडने हाणून पडल्याचे दिसून येत आहे. प्रशांत किशोर एकीकडे काँग्रेसला झुलवत ठेवून दुसरीकडे प्रादेशिक पक्षांशी चुचकारी खेळ करत होते. थोडे ग्राम्य भाषेत बोलायचे झाले तर एकीचा हात धरुन दुसरीला डोळा मारत होते. मात्र इथे प्रशांत किशोर यांचा अंदाज चुकला आणि कॉंग्रेस सारख्या 125 वर्षे देशाचे सत्तेचे राजकारण खेळणाऱ्या कॉंग्रेस पक्षाने त्यांना आपल्या गलितगात्र काळात देखील चांगलाच जमालगोटा दिला आहे…!!Hands on two degrees, there was an attack: Prashant Kishor’s innings of entering Congress was ruined

प्रशांत किशोर काँग्रेसला 600 पानी प्रेझेंटेशन देऊन झुलवत होते. काँग्रेस कशी कमजोर झाली आहे… काँग्रेसला पुनरुज्जीवित करण्यासाठी कोणते उपाययोजना करता येतील… त्यासाठी आपला कसा उपयोग होईल… आपण काँग्रेसचा नक्षा कसा बदलून टाकू… वगैरे बरीच मखलाशी प्रशांत किशोर यांनी काँग्रेस हायकमांड पुढे केली होती. त्यामुळे प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये नवी जान फुंकणार करणार अशा बातम्या माध्यमांनी चालवून घेतल्या होत्या. प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशासाठी राहुल गांधी उत्सुक असल्याच्या बातम्या देखील माध्यमांमधून जोरदार चालविल्या होत्या.



परंतु प्रशांत किशोर यांची मूलभूत मानसिकता काँग्रेस विरोधाची आणि प्रादेशिक पक्षांना अनुकूल अशीच राहिल्याने त्यांनी काँग्रेस हायकमांडला कितीही झुलवले तरी अखेरीस त्यांचे ऐकले गेले नाही. त्याविषयी काँग्रेसमध्ये मतांची दुफळी असल्याच्या बातम्या आल्या. पण काँग्रेस हायकमांड असल्या अनेक प्रशांत किशोर यांचे बारसे जेवल्याच्या बातम्या कुठे आल्या नव्हत्या…!! पण वस्तुस्थिती हीच होती की ज्या काँग्रेस हायकमांडने ममता बॅनर्जी, शरद पवार यांच्यासारख्या दिग्गज यांना धूप घातली नाही. त्यांना विशिष्ट मर्यादेपलिकडे हिंग लावून विचारले नाही, तिथे गेल्या 5 – 10 वर्षात माध्यमांनी उचलून धरलेला निवडणूक रणनीतीकार काँग्रेस आपल्या डोक्यावर बसवेल ही सुतराम शक्यताच नव्हती…!!

पण तरी देखील माध्यमांनी प्रशांत किशोर यांना फार मोठा निवडणूक रणनीतीकार ठरवून काँग्रेसचे पुनरुज्जीवन करण्याची जादूची कांडी प्रशांत किशोर मकडे आहे असा आव आणला होता.

प्रत्यक्षात प्रशांत किशोर काँग्रेसला झुलवत असताना दुसरीकडे तेलंगणमध्ये तेलंगण राष्ट्र समितीला डोळा मारत होता. तेलंगण राष्ट्र समितीचे तेलंगणमध्ये “डील” करून तो बसला आणि तिथेच त्याच्या काँग्रेस प्रवेशाची बस चुकली…!!

काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करून प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. प्रशांत किशोर तेलंगणमध्ये तेलंगण राष्ट्र समितीचे मुख्यालय प्रगती भवन येथे मुख्यमंत्री केसीआर चंद्रशेखर राव यांचे चिरंजीव के. टी. रामा राव यांच्याशी चर्चा करत होता त्यांच्याबरोबर तेलंगणचे “डील” त्याने पक्के केले. के. टी. रामा राव यांनी काँग्रेसलाच प्रादेशिक पक्ष ठरवून टाकले.

यामागे प्रशांत किशोर यांचा सल्ला आहे हे न समजायला काँग्रेसची हायकमांड काही बोळ्याने दूध पीत नाही. त्यामुळे अखेरीस काँग्रेस हायकमांडने प्रशांत किशोर नावाच्या 600 पानांचा प्रेझेंटेशनच्या चॅप्टरच मिटवून टाकला आणि आता प्रशांत किशोर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नसल्याचे किंबहुना काँग्रेसचा त्यांना प्रवेश देणार नसल्याचे स्पष्ट करून टाकले आहे…!!

Hands on two degrees, there was an attack: Prashant Kishor’s innings of entering Congress was ruined

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात