Raj Thackeray : वडिलांच्या पुण्याईचा मनसेने सांगितला खोचक अर्थ…!!


प्रतिनिधी

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी जाहीर केलेली संभाजीनगरची सभा होणार आहे की नाही, यावर सस्पेन्स कायम असताना मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरचे हल्ले आणखी प्रखर केले आहेत. MNS explained the meaning of father’s goodness

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक व्यंगचित्र सादर करून वडिलांच्या पुण्याईचा “अर्थ” सांगितला आहे. या व्यंगचित्रात एक शिक्षिका आपल्या विद्यार्थ्यांना वडिलांची पुण्याई म्हणजे नेमकी काय?, असा प्रश्न विचारते. त्यावर एक विद्यार्थी उत्तर देतो, की वडिलांची पुण्याई म्हणजे कोणतेही कर्तृत्व नसताना मंत्रिपदाची खुर्ची आणि लाल दिवा मिळणे आणि मुलाला मंत्री करता येणे. मनसेने हे व्यंगचित्र ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना टोचले आहे.

संदीप देशपांडे यांच्या ट्विटवर अनेकांनी खोचक आणि टोचक प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून राज ठाकरे यांची देखील पुण्याई नेमकी कोणाची आहे? असे सवालही काही लोकांनी केले आहेत. त्याच वेळी घराणेशाही हा महाविकास आघाडीतला रोग सगळी कडे पसरत असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

पण सध्या राज ठाकरे यांच्या विशिष्ट भूमिकांमुळे मनसे राजकीयदृष्ट्या फॉर्मात असून एकापाठोपाठ एक ट्विट आणि व्यंगचित्रे शेअर करून मनसेचे अनेक नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना टार्गेट करत आहेत.

MNS explained the meaning of father’s goodness

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात