प्रशांत किशोरांवर भरोसा नाय, लोकसभा निवडणुकीची रणनिती ठरविणार कॉँग्रेसच्या सहा समित्या


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर कॉँग्रेसच्या पुढील रणनितीबाबत अनेक योजना आखत असले तरी कॉँग्रेसला मात्र त्यांच्या रणनितीवर भरोसा नसल्याचेच दिसून येत आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेसची रणनिती ठरविण्यासाठी सहा अंतर्गत समित्या गठित केल्या जाणार आहेत.No relying on Prashant Kishor, six Congress committees will decide the strategy for the Lok Sabha elections

काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काय धोरण असेल हे एम्पावर्ड अ‍ॅक्शन ग्रुप ठरवेल. सोमवारी 10 जनपथ येथे झालेल्या बैठकीत काँग्रेसने भविष्यासंदर्भात मोठा निर्णय घेतला, त्याअंतर्गत काँग्रेसने 6 नवीन समित्या स्थापन केल्या आहेत.काँग्रेस उदयपूरमध्ये 13 ते 15 मे दरम्यान नव संकल्प चिंतन शिबिर घेणार आहे. ज्यामध्ये शेतकरी आणि कृषी, युवक आणि बेरोजगारी, संघटनात्मक बाबी, सामाजिक सक्षमीकरण, आर्थिक स्थिती आणि राजकीय बाबींचा समावेश असलेल्या सहा अजेंडांवर चर्चा करण्यासाठी सहा स्वतंत्र समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

या सर्व 6 समित्यांमध्ये मल्लिकार्जुन खर्गे, सलमान खुर्शीद, पी. चिदंबरम, मुकुल वासनिक, भूपिंदरसिंग हुडा आणि अमरिंदर सिंग वारिंग हे वेगवेगळ्या समित्यांचे निमंत्रक असतील.दरम्यान, सोनिया गांधी यांनी प्रशांत किशोर यांनी आखलेल्या योजना आणि त्यांचा पक्षात प्रवेश यावर विचार करण्यासाठी काँग्रेस नेत्यांची एक समिती स्थापन केली होती. या समितीने आपला अहवाल पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना सादर केला आहे.

समितीचे सदस्य केसी वेणुगोपाल, दिग्विजय सिंग, अंबिका सोनी, रणदीप सुरजेवाला, जयराम रमेश आणि प्रियंका गांधी वाड्रा यांनी 10 जनपथवर जाऊन प्रशांतवर निर्णय घेतला. मात्र, भेटीनंतर रणदीप सुरजेवाला यांनी प्रशांतबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस हायकमांडसोबत तीन बैठका झाल्या आहेत. यावेळी त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवावर विचारमंथन केले. इतकंच नाही तर पीके यांनी काँग्रेसला 600 पानी प्रेझेंटेशनही दिलं, ज्यामध्ये सत्तेत परतण्यासाठी पक्षाला काय करावं लागेल हे सांगितलं होतं.

प्रशांत किशोर यांच्या प्रस्तावाची चौकशी करण्यासाठी सोनिया गांधी यांनी एक विशेष टीम तयार केली होती. आता प्रशांतने इतर सर्व राजकीय पक्षांपासून दूर राहावे आणि काँग्रेसला पूर्णपणे वाहून घ्यावे अशी समितीची इच्छा आहे. प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला दिलेल्या सूचनेनुसार काँग्रेसने ममता बॅनर्जींच्या टीएमसी आणि केसीआरच्या टीआरएस सारख्या प्रादेशिक पक्षांसोबत युती करायला हवी.

No relying on Prashant Kishor, six Congress committees will decide the strategy for the Lok Sabha elections

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!