विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद : नव्या रक्ताला संधी देण्याच्या नुसत्या वल्गना करणाऱ्या कॉँग्रेसला तरुण नेते सांभाळता येत नाहीत हे पुन्हा सिध्द झाले आहे. गेल्या निवडणुकीत कॉँग्रेसने गुजरातमध्ये ज्यांच्या जीवावर बरी कामगिरी केली त्या अल्पेश ठाकूरनंतर आता हार्दिक पटेलही कॉंग्रेस सोडण्याच्या तयारीत आहे.Hardik Patel is preparing to leave the party, likely to join BJP
गुजरात विधानसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना काँग्रेसला या भाजपशासित राज्यात जबर धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसने नेते हार्दिक पटेल यांनी आपल्या व्हॉट्सअॅप व टेलिग्राम बायोतून काँग्रेसचे नाव वगळले आहे. त्यामुळे ते लवकरच भाजपत जातील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
हार्दिक यांनी आपला लढा काँग्रेस कार्यकर्त्यांच्या हिताचा असल्याचा दावा केला आहे. एवढेच नाही तर त्यांनी आपला व्हॉट्सअॅप डीपीही बदलला आहे नव्या डीपीत त्यांनी भगवी शाल पांघरल्याचे दिसत आहे. हार्दिक यांनी अलीकडच्या काळात स्वत:ला हिंदुत्वाशी जोडले आहे. आपल्या हिंदू असल्याचा गर्व असल्याचे ते नुकतेच म्हणाले होते. त्यांच्या या भूमिकेमुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी ते भाजपत प्रवेश करतील असा दावा केला जात आहे. आपल्यावर भाजपत जाण्याची वेळ आली तर या प्रकरणी मी खूल्या मनाने लोकांचे विचार जाणून घेईल, असे ते म्हणाले होते.
हार्दिक काँग्रेसवर नाराज आहे. यापूवीर्ही त्यांनी अनेकदा जाहीर भाष्य केले आहे. नव्या वराची नसबंदी करावी अशी अवस्था आपली काँग्रेसमध्ये झाल्याचे ते म्हणाले होते. काँग्रेसमध्ये आपल्याला कोणतेही निर्णय घेण्याचे अधिकार नसल्याचा आरोपही त्यांनी या प्रकरणी केला होता.
हार्दिक यांनी दिल्लीत भाजपच्या एका मोठ्या नेत्याची भेट घेतली आहे. यामुळेही ते लवकरच भाजपत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण, त्यांनी अद्याप या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली नाही. ‘कुणीही आपल्या कुटूंबावर नाराज होत नाही. प्रत्यक्षात प्रकृती ठणठणीत होती.
पण, लोकांनी प्रश्न विचारुन ती खराब केली,’ असे ते म्हणाले होते. ते म्हणाले -‘मी मागे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचीही प्रशंसा केली होती. मग, मी बायडेन यांच्यासोबत जाईल काय?’ उल्लेखनीय बाब म्हणजे हार्दिक यांनी यापूर्वी अनेकदा भाजपची प्रशंसा केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App