प्रतिनिधी
मुंबई : आदिपुरुष या सिनेमातील रावण आणि हनुमान यांच्या लुकवरून देशात वाढता असंतोष दिसून येत असून मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा आणि महाराष्ट्र भाजपचे नेते राम कदम यांनी त्यासंदर्भात निर्मात्यांवर शरसंधान साधले आहे. Growing dissatisfaction with the look of Hanuman – Ravana in the movie
सिनेमातील हनुमानाच्या वेशभूषेत चामड्याच्या वस्तू वापरल्याचे लक्षात आले आहे. हा त्या देवतेचा अपमान आहे. आम्ही निर्मात्यांना सांगतो. ते बदला, असे ट्विट मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी केले आहे, त्यानंतर भाजप आमदार राम कदम यांनीही टीका केली आहे. आदिपुरुष हा सिनेमा महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होऊ देणार नाही, असे ट्विट राम कदम यांनी केले आहे. त्यांच्या या ट्वीटने अनेकांचे लक्ष वेधले आहे. आदिपुरुष या चित्रपटाने देवीदेवतांचे विडंबन केले आहे, असा आरोप राम कदम यांनी केला आहे.
राम कदम यांनी शेअर केलेल्या ट्वीटमध्ये लिहिले आदिपुरुष हा चित्रपट निर्मात्यांनी आपल्या देवी देवतांचे विडंबन करुन कोट्यवधी हिंदू लोकांच्या भावाना दुखावल्या आहेत. आता वेळ आली आहे. त्यांनी माफीनामा द्यावा.
चित्रपटाची दृष्ये कट करुन काही होणार नाही. अशा घृणास्पद विचारसरणीला धडा शिकवण्यासाठी या चित्रपटावर बंदी घातली पाहिजे. तसेच, जे लोक यासाठी जबाबदार आहेत, त्यांना इंडस्ट्रीमध्ये काही वर्षांसाठी बॅन केले पाहिजे. जेणेकरुन भविष्यात असे करण्याचे धाडस कोणी करणार नाही, असेही राम कदम यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे.
नेटक-यांनी केले ट्रोल
आदिपुरुष या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलिज झाला होता. या चित्रपटात प्रभासन याने प्रभू रामांची भूमिका साकारली आहे. तर कृती सेनने ही सीता या भूमिकेतून आणि सैफ रावण या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. लक्ष्मणाची भूमिका अभिनेता सनी सिंह साकारत आहे. या टीझरमधील VFX ला आणि सैफच्या लूकला काही नेटकरी सध्या ट्रोल करत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App