सावरकरांवर देशातली पहिली डॉक्टरेट मिळवणारे विचारवंत, शिक्षणतज्ञ डॉ. प्र. ल. गावडे यांचे निधन


प्रतिनिधी

पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आणि साहित्यावर प्रबंध सादर करून पहिली डॉक्टरेट पदवी मिळवणारे विचारवंत आणि शिक्षणतज्ञ डॉ. प्र. ल. गावडे यांचे आज निधन झाले. Great savarkariet thinker Dr. P. L. Gavade is no more

ते विमलाबाई गरवारे प्रशालेचे मुख्याध्यापक होते. सावरकरांच्या निधनानंतर दोनच वर्षांनी सन १९६८ मध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जीवन कार्य आणि साहित्य या विषयावर त्यांनी पुणे विद्यापीठाला पहिला संशोधन प्रबंध सादर केला. सावरकर या विषयावर देशातील पहिली डॉक्टरेट मिळवणारे ते विचारवंत अभ्यासक ठरले.गावडे यांची शैक्षणिक आणि वैचारिक कारकीर्द मोठी आहे. वाईच्या धर्मपुरी घाटावरील आणि पुण्यातील वसंत व्याख्यानमालेत त्यांनी दिलेली व्याख्याने गाजली. पुण्याच्या व महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षैत्रात त्यांनी स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले होते. ते काही काळ आळंदी देवस्थानचे अध्यक्ष होते. त्यांनी अनेक पुरस्कार प्राप्त केले होते. गावडे यांचे पुणे येथे त्यांच्या घरी निधन झाले. बरेच दिवस ते आजारी होते.

Great savarkariet thinker Dr. P. L. Gavade is no more

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण