GOLD HALLMARK : उद्यापासून देशात गोल्ड हॉलमार्किंग बंधनकारक; घरात असलेल्या सोन्याला लागू होणार हा नियम? फसवणूक झाल्यास BIS-Care App वरून करा तक्रार


  • केंद्र सरकारने सोन्याचे दागिने व कलाकृतींसाठी अनिवार्य हॉलमार्किंग सिस्टमची मुदत 1 जून ते 15 जून पर्यंत वाढविली होती. यानंतर, ज्वेलर्सना केवळ 14, 18 आणि 22 कॅरेट सोन्याचे दागिने विकण्याची परवानगी आहे. बीआयएस एप्रिल 2000 पासून सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्किंग योजना चालवित आहे. सध्या सोन्याच्या दागिन्यांपैकी 40 टक्के दागिने चिन्हांकित केले जात आहेत.

  • या नव्या नियमानुसार, आता 14, 18 आणि 22 कॅरेटच्या सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क (BIS Hallmark) असणे बंधनकारक असणार आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई: उद्यापासून देशात गोल्ड हॉलमार्किंग बंधनकारक असणार आहे.  त्यामुळे सोने खरेदी करताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेण्याची गरज आहे. सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता ओळखता यावी यासाठी बीआयएस हॉलमार्किंग सक्तीचे करण्यात आले आहे. या नियमाचा आराखडा  दीड वर्षांपूर्वीच तयार करण्यात आला. मात्र कोरोना संकटामुळे तो लागू करण्यात आला नव्हता. आता उद्यापासून देशात त्याची अंमलबजावणी सुरू होईल.GOLD HALLMARK: Gold hallmarking mandatory in the country from tomorrow; Will this rule apply to gold in the house? Report fraud from BIS-Care App

गोल्ड हॉलमार्किंगमुळे सोन्याची दागिन्यांची शुद्धता ठरते. यापुढे सोने व्यावसायिकांना दागिन्यांची विक्री करताना बीआयएसचे मापदंड पूर्ण करावे लागतील. निकष पूर्ण केल्यावरच त्यांना हॉलमार्किंग मिळेल.

सोन्याच्या शुद्धतेनुसार त्याचे विविध प्रकार पडतात. त्यामुळे कोणत्या प्रकारच्या सोन्याला हॉलमार्किंग गरजेचे आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल  तर उत्तर 14 कॅरेट, 18 कॅरेट आणि 22 कॅरेट असे याचे उत्तर आहे.

नियमाचे उल्लंघन केल्यास बीआयएस कायदा 2016 च्या 29 कलमाखाली कारवाई केली जाऊ शकते. उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला 1 वर्षाचा कारावास आणि 1 लाख रुपयाच्या दंडाची तरतूद आहे.

दुकानदाराचे तुमची फसवणूक केल्यास ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डकडे ऑनलाईन किंवा ऑफलाईन तक्रार करू शकता. ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठी बीआयएसच्या मोबाईल ऍप किंवा तक्रार नोंदणी पोर्टलचा वापर करू शकता.

ग्राहकांना घाबरण्याची गरज नाही. हॉलमार्किंगचा नियम सोन्याची विक्री करणाऱ्यांसाठी लागू असेल. ग्राहक त्यांच्याकडे असलेलं सोनं हॉलमार्कशिवाय विकू शकतात.

BIS-Care App – असे करा डाऊनलोड?

बीआयएस-केअर ॲप हे सध्या केवळ अँड्रॉईड वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. हे Google Play Store वर उपलब्ध आहे. सद्यस्थितीत हे ॲप दहा हजारांहून अधिकांनी डाऊनलोड केलं आहे. चला तर जाणून घेऊ, तुम्ही हे ॲप कसे डाऊनलोड करु शकता?

💠सर्वप्रथम Android युजर्सने Google Play Store वर जा.

💠त्या ठिकाणी असलेल्या सर्च ऑप्शनमध्ये बीआयएस-केअर अ‍ॅप शोधा.

💠ते ॲप दिसल्यानंतर त्यावर टॅप करुन Install या ऑप्शनवर क्लिक करा.

💠बीआयएस-केअर ॲप हे वापरणे खूप सोपे आहे. यासाठी तुम्हाला फक्त एकदाच नोंदणी करावी लागते.

💠ॲप डाऊनलोड झाल्यानंतर बीआयएस केअर ॲप ओपन करा

💠तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी या सर्व गोष्टींची यात नोंद करा

💠यानंतर ओटीपीद्वारे तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी व्हेरिफाय होईल.

💠त्यानंतर तुम्ही हे ॲप वापरु शकता.

GOLD HALLMARK: Gold hallmarking mandatory in the country from tomorrow; Will this rule apply to gold in the house? Report fraud from BIS-Care App

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात