श्री संत गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांचे निधन

प्रतिनिधी

शेगाव :  लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री संत गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांचे  दीर्घ आजाराने आज निधन झाले. ते ८२  वर्षांचे होते. gajanan maharaj sansthan shegaon managing trustee shivshankar bhau patil past away

गेले काही दिवसांपासून त्यांची प्रकृती “मल्टीऑर्गन फेल्युअर “मुळे  चिंताजनक होती. गेले दोन दिवसांत ती अधिक गंभीर झाली होती. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. मात्र, आज दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.



नियोजनबद्ध कार्यपद्धती व शिस्तप्रियतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या शिवशंकरभाऊंच्या नेतृत्वात श्रीगजानन महाराज संस्थानचा नावलौकिक संपूर्ण देशभर पसरला आहे. त्यांचे हे कार्य देशभरातील सर्व संस्थांना व्यवस्थापनशास्त्रातील मार्गदर्शक ठरणारी आहे.

राजकीय व्यक्तींमध्ये वरिष्ठांपर्यंत त्यांचे संबंध होते. शेगाव नगरपालिकेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. शहराच्या विकासाकरिता राज्य शासनाने विकास आराखडा मंजूर केला विकास आराखड्यात शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी भाऊंचे मार्गदर्शन हे विकासाकरिता मैलाचा दगड ठरले.

gajanan maharaj sansthan shegaon managing trustee shivshankar bhau patil past away

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात