आर्यन खान क्रूझ ड्रग प्रकरणातील एनसीबीचा पंच किरण गोसावी याच्याविरुद्ध भोसरी पोलीस ठाण्यात फसणुकीचा चौथा गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्यावर यापूर्वी फरासखाना, वानवडी, लष्कर पोलीस ठाण्यात फसवणूकीचे गुन्हे दाखल झालेले आहेत. सध्या तो लष्कर पोलिसांच्या अटकेत आहे.Fourth case has been registered against NCB witness Kiran Gosavi in a cruise drug case at Bhosari police station
विशेष प्रतिनिधी
पुणे : आर्यन खान क्रूझ ड्रग प्रकरणातील एनसीबीचा पंच किरण गोसावी याच्याविरुद्ध भोसरी पोलीस ठाण्यात फसणुकीचा चौथा गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्यावर यापूर्वी फरासखाना, वानवडी, लष्कर पोलीस ठाण्यात फसवणूकीचे गुन्हे दाखल झालेले आहेत. सध्या तो लष्कर पोलिसांच्या अटकेत आहे.
याप्रकरणी विजयकुकमार सिद्धलिंग कानडे (वय ३३,रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. कानडे २०१५ मध्ये नोकरीच्या शोधात होते. ऑनलाईन अर्ज केला असल्याने त्यांना वेगवेगळ्या जॉब पोर्टलवरुन नोकरीसाठी ऑफर येत होत्या. शिवा इंटरनॅशनल या कंपनीकडून मार्च २०१५ रोजी त्यांना ई मेल आला. परदेशात हॉटेल मॅनेजमेंटच्या नोकरीबाबत त्यामध्ये माहिती देण्यात आलेली होती. त्यांनी शिवा इंटरनॅशनलच्या आयडीवर बायोडाटा पाठविला.
किरण गोसावी याने कानडे यांना मलेशिया येथील बुनेई येथे नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. नोकरीसाठी नाशिक फाटा येथे भेटून ३० हजार रुपये घेतले. गोसावीच्या सांगण्यावरून कानडे यांनी शिवा इंटरनॅशनल याच्या घोडबंदर रोड येथील कार्यालयामध्ये जाऊन ५ एप्रिल २०१५ रोजी त्याला ४० हजार रुपये रोख दिले. तसेच बँक खात्यावर २० हजार पाठविले. वैद्यकीय तपासणी करण्यासाठी किरण गोसावीच्या ठाणे येथील कार्यालयात जाऊन १० हजार रुपये देखील करण्यात आले. अशा प्रकारे त्यांच्याकडून २ लाख २५ हजाररुपये उकळण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App