नाशिक : सत्ता गेल्याची मळमळ आणि काका पुतण्यांचे वस्त्रहरण; दोघांच्याही अनुयायांचा एकच कार्यक्रम!!, असे म्हणायची वेळ शरद पवार आणि अजित पवार या काका पुतण्यांच्या अनुयायांनी आणली आहे. या दोघांचेही दुसऱ्या फळीतले नेते एकमेकांचे वस्त्रहरण करण्याच्या मागे लागले आहेत. पण असे करण्यातून आपण आपल्याच पूर्वीच्या राजकीय इतिहासातून आपल्या विरोधकांनाच वेगवेगळ्या मुद्द्यांचा आयता दारुगोळा पुरवतो आहोत याचे भानही काका – पुतण्यांच्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांना उरलेले नाही!!Fierce political fighting erupted between sharad pawar and ajit pawar factions, both exposed each other!!
याची सुरुवात राष्ट्रवादीच्या फुटी बरोबर झाली हे खरे, पण प्रत्यक्ष निवडणूक आयोगातल्या कायदेशीर लढाईत त्याला जास्त तोंड फुटले आणि शरद पवार गटाने अजित पवारांवर पवारांविरुद्ध वापरलेला “भेकड” हा शब्द अजित पवार गटाला जास्त डिवचला आणि त्यातून अजित पवार गटाचा भडका उडाला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष वाढीत अजित पवारांचा काहीही वाटा नाही. अजित पवार “कॉवर्ड” आहेत. त्यांनी आपल्या काकांचा पक्ष चोरून नेला स्वतःचा पक्ष काढला नाही, असा आरोप शरद पवार गटाने केला. यातल्या “कॉवर्ड” शब्दाचा अर्थ “भेकड”, असा काढून अजित पवार गटाने शरद पवार गटावर पलटवार केला. यात सुनील तटकरे, धनंजय मुंडे आघाडीवर राहिले. सुनील तटकरे यांनी 70000 कोटींचा घोटाळा हा शब्द केव्हा आणि कसा आला??, तो अजितदादांना कसा चिकटला??, याचा इतिहास सांगितला. 1952 ते 2012 या कालावधीत महाराष्ट्राच्या सिंचनावर 70000 कोटी रुपये खर्च झाला असे सांगितले गेले. यातले 15000 कोटी रुपये आस्थापनेवर खर्च झाले, 12000 कोटी रुपये खर्च झाले आणि उरलेले 30 – 35000 कोटी रुपये सिंचनावर खर्च झाले आणि फक्त 0.1% सिंचन झाले, असे सांगितले गेले पण प्रत्यक्षात लाखो हेक्टर जमीन सिंचनाखाली आली होती.
अजितदादा भेकड नाहीत , दिलेला शब्द पाळणारे अजितदादा , प्रशासनावर वचक असणारे अजितदादा,भाजपा सोबत सरकार आणि 43 आमदारांचा पाठिंबा आणि घड्याळ तेच वेळ नवीन…. वगैरे वगैरे भाषणबाजी करणारे निवडणूक आयोगाकडे नोंदणी नसलेल्या गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब आपण माझ्या सामान्य… — Vikas Lawande (@VikasLawande1) November 30, 2023
अजितदादा भेकड नाहीत , दिलेला शब्द पाळणारे अजितदादा , प्रशासनावर वचक असणारे अजितदादा,भाजपा सोबत सरकार आणि 43 आमदारांचा पाठिंबा आणि घड्याळ तेच वेळ नवीन…. वगैरे वगैरे भाषणबाजी करणारे निवडणूक आयोगाकडे नोंदणी नसलेल्या गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब आपण माझ्या सामान्य…
— Vikas Lawande (@VikasLawande1) November 30, 2023
त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी अजितदादांची भेट व्हावी अशी इच्छा व्यक्त करून अनेकदा निरोप पाठवले. पण ती भेट घडवून देण्यात आली नाही. त्यांचा राजीनामा मात्र मंजूर झाल्याची बातमी मात्र कलकत्त्याहून पुढे आली याचा अर्थ अजितदादांचा राजकीय बळी घेतला,असा आरोप तटकरे यांनी शरद पवारांचे नाव न घेता केला. त्याचवेळी अजितदादा जर “भेकड” असते तर 43 आमदार बरोबर घेऊन सत्तेत सामील झाले असते का??, असा बोचरा सवाल केला. 2014 ते 2017 या कालावधीत भाजपबरोबर सत्तेत जाण्यासंदर्भात शरद पवारांनी वारंवार भूमिका बदलण्याचा तपशीलवार उल्लेख सुनील तटकरे यांनी केला.
त्यानंतर धनंजय मुंडेंनी देखील शरद पवार गटावर आपली भडास काढून घेतली. तोंडाने लोकशाही बोलायचं, पण प्रत्यक्षात पक्षात हुकूमशाही चालवायची असला प्रकार राष्ट्रवादीमध्ये सुरू होता. अजित पवारांनी पुढे येऊन लोकशाहीचा मुद्दा उपस्थित केला. त्यांना आमदारांनी साथ दिली आणि आता अजित पवारांना “भेकड” म्हणतात, असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला.
आता काहींना आपण दादांची जागा घेऊ असे भास होत आहेत, पण हेच “ते” होते “जे” त्यावेळी भाजपकडून कर्जत जामखेडच्या जागेसाठी फिल्डिंग लावत होते, असा टोला धनंजय मुंडे यांनी रोहित पवारांना हाणला. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेतला की अजितदादांना खलनायक ठरविले, असे राष्ट्रवादीतले बिंग देखील धनंजय मुंडे यांनी फोडून टाकले.
अजित दादा गटाला तिखट सवाल
अजित पवार गटाकडून असे तिखट वार होत असताना शरद पवार गटही गप्प बसला नाही. शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर 10 प्रश्न विचारून अजित पवार गटाला घेरले. त्यात त्यांनी अजितदादांना त्यांनी भेकडच म्हटले!!
@VikasLawande1
अजितदादा भेकड नाहीत, दिलेला शब्द पाळणारे अजितदादा, प्रशासनावर वचक असणारे अजितदादा, भाजपा सोबत सरकार आणि 43 आमदारांचा पाठिंबा आणि घड्याळ तेच वेळ नवीन…. वगैरे वगैरे भाषणबाजी करणारे निवडणूक आयोगाकडे नोंदणी नसलेल्या गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब आपण माझ्या सामान्य प्रश्नांची उत्तरे द्याल का?
काका – पुतण्यांच्या वादाची अजून होईना निस्तरा निस्तरी, तोवर शरदनिष्ठांची 16 जागांवर दावा ठोकण्याची तयारी!!
1) अजितदादा भेकड नसते हिंमत असती तर स्वतःचा नवा पक्ष स्थापन केला असता पण तसे न करता पक्ष संस्थापक आदरणीय Sharad Pawar साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर कुणाच्या आधाराने हक्क दाखवत आहात ? स्वाभिमानी अजितदादा दिल्लीपुढे का झुकले ? ED ला का घाबरले? त्यांनी ED ला मा. पवार साहेबांनी जसे आव्हान दिले होते तसे जाहीर आव्हान का दिले नाही? तुम्ही सर्वजण भेकड की अटकेला घाबरले?
2) प्रशासनावर वचक असता तर प्रशासनातील प्रचंड भ्रष्टाचार, काम चुकारपणा कसा व का वाढला? जनतेची जातीचे दाखले ते इतर योजनांची विविध स्तरावर काम प्रलंबित का आहेत? झिरो पेंडंसी का नाही? 4 महिन्यात कोण सार्वजनिक महत्वाची कामे केली? मराठा आरक्षण मुद्यावर काय भूमिका बजावली? भुजबळांना पाठिंबा की मराठा आंदोलकांना पाठींबा हे कधी सांगणार?
3) सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपा घेत नाही त्याला तुमचा पाठींबा आहे का? कारण आधी अजितदादा सतत मागणी करत होते आत्ता गप्प का?
4) 43 आमदारांची घेतलेली पाठिंब्याची प्रतिज्ञापत्र दिशाभूल करून दबावाखाली जबरदस्तीने घेतली की नाही ? त्यांचा सर्वांचा एकत्रित फोटो व्हिडिओ जनतेला का दाखवत नाही?
5) खोके सरकारमध्ये अजितदादा DCM 2 आहेत हे दादांचे प्रमोशन की डिमोशन आहे? हा दादांचा स्वाभिमान की आणखी काय समजायचे?
6) ‘घड्याळ तेच वेळ नवीन ‘ कुठून येतो इतका आत्मविश्वास? दिल्लीची अदृश्य शक्तीमुळेच ना?
7) देशाच्या पंतप्रधानांनी भोपाळ सभेत जाहीरपणे केलेला 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा व भ्रष्टाचाराचा आरोप केला तो खरा की खोटा होता? त्याबाबत अधिकृत खुलासा कधी होईल?
8) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आज पर्यंत भाजपाने जे जे विविध भ्रष्टाचाराचे आरोप केले होते ते कुणावर केले होते? पक्षाची कायमच बदनामी कुणामुळे होत होती?
9) तुम्हाला सर्वांना अनेक वर्ष मंत्रीपदे मिळाली सत्ता उपभोगायला मिळाली निवडणुकीत मते मिळाली कुणामुळे ? राज्यात सर्व तुमच्या सर्वांच्या हातात सत्ता व पक्ष होता तो पक्ष का वाढवला नाही? लहान मोठे सर्वत्र ठेकेदार कुणी जपले होते?
10) आपल्याला राजकीय पटलावर ज्यांनी मोठी ओळख निर्माण करून दिली त्या आदरणीय शरद पवार साहेबांच्या बाबत कृतज्ञता व्यक्त करता येत नसेल तर किमान कृतघ्नपणा तरी का करता?
या 10 सवालांमधून शरद पवार गटाने अजित पवार गटाचे पुरते वस्त्रहरण केले. त्याआधी अजित पवार गटाच्या नेत्यांनी शरद पवारांच्या “तळ्यात मळ्यात” भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करून सत्ता गेल्याची मळमळ व्यक्त केली. या सगळ्यामुळे राष्ट्रवादीतलेच दोन गट समोरासमोर येऊन पवार काका – पुतण्यांच्या अनुयायांनीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या मूलभूत सत्तालोलूप स्वरूपाचे वस्त्रहरण केले!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more