वृत्तसंस्था
पाटणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेतील संविधान दिनाच्या कार्यक्रमावर काँग्रेससह 14 विरोधी पक्षांनी बहिष्कार घातल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिवारवादी राजकीय पक्षांवर केलेल्या टीकेला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी देखील दुजोरा दिला आहे. किंबहुना मोदींच्या सुरात नितीश कुमारांनी आपला सूर मिसळला आहे.Family parties threaten democracy; Modi – Nitish Kumar
संविधान दिनाच्या संसदेतल्या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी यांनी देश आता एका गंभीर धोक्याच्या दिशेने चालला आहे आणि हा धोका परिवारवादी राजकीय पक्षांकडून होताना दिसतो आहे. देशापेक्षा आणि लोकशाहीपेक्षा आपला परिवार वाचविण्याचा आणि वाढविण्याचा प्रयत्न या परिवारवादी राजकीय पक्षांकडून होणे हा खऱ्या अर्थाने लोकशाहीला धोका आहे, असे प्रतिपादन केले आहे. या विषयावर देशभर सोशल मीडियातून टीकाटिपणी होत आहे.
मुख्यमंत्री ममतादिदी पोचल्या दिल्लीत, पंतप्रधान मोदींना भेटणार
पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्यावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी याबाबत मोदींच्या सुरात सूर मिसळला. ते म्हणाले, की हे नक्की खरे आहे की परिवारवादी पक्षांचा लोकशाही प्रक्रियेला धोका आहे. सध्या परिवारवादी पक्षांना काही प्रमाणात यश मिळताना दिसते आहे. परंतु ते कायमचे टिकणारे नाही. आगामी काळात भारतात लोकशाही प्रक्रियेविषयी जशी जागृती होईल तसे या परिवारवादी पक्षांचे राजकीय महत्त्व कमी होत जाताना आपल्याला दिसेल, असे मत नितीशकुमार यांनी व्यक्त केले आहे.
– मोदींच्या सुरात सूर मिसळूण्याचे कारण काय?
बिहार मध्ये नितीश कुमार यांच्या जनता संयुक्त जनता दलाची भाजपशी आघाडी असली तरी प्रत्येक गोष्टीत नितीश कुमार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरात सूर मिसळताना आढळत नाहीत. मग परिवारवादी पक्षांचा लोकशाहीला धोका आहे, या मोदींच्या वक्तव्यावर नितीश कुमार यांनी सहमती व्यक्त करण्याचे कारण काय आहे? कारण उघड आहे नितीश कुमार यांचा पक्ष परिवारवादी नाही. त्या पक्षाला मर्यादित स्वरूपात बिहारमध्ये कायम यश मिळत राहिले आहे. मात्र त्यांचा विरोधी पक्ष राष्ट्रीय जनता दल हा संपूर्णपणे लालूप्रसाद यादव यांच्या परिवाराचा पक्ष आहे. मोदींना पाठिंबा देण्याच्या निमित्ताने लालूप्रसाद यांच्या पक्षावर नितीश कुमार यांना बाण सोडता आला आहे.
त्याचबरोबर त्याचे अन्य एक कारण राष्ट्रीय पातळीवरचे राजकारण देखील आहे. सन 2014 च्या आसपास नितीश कुमार यांचे नाव नरेंद्र मोदी यांच्या बरोबरीने पंतप्रधान पदासाठी घेतले जात होते. भाजपला बहुमत मिळाले नाही तर मोदींचे नाव मागे पडून राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएचे घटक पक्ष नितीश कुमार यांच्या नावाला पंतप्रधान पदासाठी प्रश्न मान्यता देतील, अशी त्यावेळी चर्चा होती. परंतु आता पाटण्याजवळच्या गंगेतून बरेच पाणी वाहून गेले आहे. मोदी पंतप्रधान पुढे येऊन सात वर्षे उलटून गेली आहेत. नितीशकुमारांचे वय झाले आहे. राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणात मोदींच्या स्पर्धक म्हणून ममता बॅनर्जी यांचा उदय होताना दिसतो आहे. त्यांची तृणमूळ काँग्रेस देखील परिवारवादीच पक्ष आहे. अरविंद केजरीवाल मध्येच डोकवत आहेत.
अशा स्थितीत कोणती राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा उरली नसताना सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाजूने एखादे मत व्यक्त केले तर फारसा राजकीय तोटा नाही. झालाच तर फायदाच आहे, असा नितीश कुमार यांचा राजकीय होरा असू शकतो. त्यामुळे आज मोदींनी व्यक्त केलेल्या मताशी त्यांनी सहमती दर्शविली आहे, असे मानण्यास वाव आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App