विधानपरिषदेवर आमदार म्हणून नियुक्ती झाल्याचे राज्यपालांच्या खोट्या सहीचे पत्र सोशल मीडियात व्हायरल केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. False signature letter of Governor appointed as MLA on Legislative Council goes viral
विशेष प्रतिनिधी
पुणे : विधानपरिषदेवर आमदार म्हणून नियुक्ती झाल्याचे राज्यपालांच्या खोट्या सहीचे पत्र सोशल मीडियात व्हायरल केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
प्रमोद ठोंबरे (वय २५, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), असे गुन्हा दाखल केलेल्या तरुणाचे नाव आहे. अजीज नवाब शेख (वय ४३, रा. खराळवाडी, पिंपरी) यांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. ८) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
ठोंबरे हा फिर्यादी शेख यांच्याकडे चालक म्हणून कामास होता. त्याने राज्यपालांच्या खोट्या सहीचे पत्र तयार केले. फिर्यादी अजीज शेख यांची विधान परिषद सदस्यपदी निवड झाली आहे, त्या पत्रात खोटे नमूद केले. राज्यपालांच्या खोट्या सहीचे ते पत्र एका संगणकावर तयार केले.
या बनावट पत्राद्वारे फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. शेख यांच्या भावाच्या व्हॉटसअप नंबरवरसुद्धा ठोंबरे याने पत्र पाठवले.
False signature letter of Governor appointed as MLA on Legislative Council goes viral
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App