विशेष प्रतिनिधी
पुणे: जातनिहाय जनगणनेच्या आकडेवारीसाठी बिहारमधील सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने राजकीय मतभेद बाजूला सारत पंतप्रधानांची एकत्रित भेट घेतली. असेच चित्र आपल्या राज्यातही दिसलं असते तर असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. Everyone should come together for caste wise census, rohit pawar appeals
याबाबत केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की राज्यातील महाविकास आघाडी सरकार योग्य दिशेने प्रयत्न करत आहे.
केंद्र सरकारने इम्पिरिकल डेटा उपलब्ध करून दिला तर आरक्षणाचा विषय मार्गी लागण्यास मोठी मदत होईल. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि देशातील इतर राज्यांनीही हीच मागणी केली आहे. त्यामुळं केंद्र सरकार यात निश्चित लक्ष घालेल, ही अपेक्षा आहे, असंही रोहित पवारांनी पंतप्रधान मोदींना टॅग करून म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App