महाविकास आघाडीवरचे टोकदार आरोप आणि संजय राऊतांभोवतीचा “प्रश्न पिंगा…!!”


शिवसेनेतली खदखद वाढत असताना संजय राऊत पुरे पडायला ते काय संकटमोचक आहेत का…??

-संजय राऊतांनी शिवसेनेतल्या खदखदीकडे आणि राष्ट्रवादीच्या कटकटीकडे दुर्लक्ष केले किंवा मराठी माध्यमांनी त्यांना टोकदार प्रश्न विचारले नाहीत म्हणून शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची राजकीय हानी होण्याचे थांबणार नाही. ती थांबविण्यासाठी काँग्रेसच्या करूणाकरन किंवा एनडीएच्या जॉर्ज फर्नांडिसांचीच गरज लागेल. संजय राऊतांचे स्थान फारतर मुलायम सिंहांच्या काळातील समाजवादी पक्षातल्या अमरसिंहांसारखे आहे. फक्त फरक हा आहे, अमरसिंह हे page 3 सेलिब्रिटी होते. संजय राऊत हे मराठी माध्यमांचे सेलिब्रिटी आहेत…!! Does Sanjay Raut has a real political status of “Sankatmochak” as K. Karunakaran or George Fernandis? or is he just like Amar Singh??


महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारमधील दोन घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या भोवतीचा राजकीय फास आवळत चालला असताना एकटे संजय राऊत कुठे कुठे पुरे पडतील…??, असा गंभीर प्रश्न तयार व्हायला लागला आहे.

संजय राऊत दिल्लीत आणि मुंबईत शिवसेनेचा किल्ला लढवताना दिसतात. माध्यमांमध्ये ते चमकतात. किंबहुना माध्यमे त्यांना चमकवतात, असे म्हणणे योग्य ठरेल. कारण मराठी माध्यमांचे पत्रकार संजय राऊतांना ज्या प्रकारचे प्रश्न विचारतात, ते पाहून ते प्रश्नांनी “घेरलेत” किंवा “वेढलेत” असे न वाटता, मराठी माध्यमांच्या पत्रकारांचे प्रश्न संजय राऊतांभोवती “पिंगा” घालत आहेत, असेच वाटते.

मराठी माध्यमांचे दिल्लीतले किंवा मुंबईतले कोणीही मराठी पत्रकार संजय राऊतांना अडचणीचे ठरतील असे प्रश्नच विचारताना दिसत नाहीत. उलट महाविकास आघाडीवरील टोकदार आरोपांचे प्रश्न मराठी पत्रकार टोक उडवून विचारतानाच दिसतात. ते राऊतांना हवे तसेच ठरीव प्रश्न विचारतात आणि त्यांची उत्तरे संजय राऊत हातवारे करून मान वेळावत देतात.

त्यामुळे संजय राऊतांची प्रतिमा चमकताना दिसते. पण चकाकते ते सगळेच सोने नसते. कारण संजय राऊत म्हणजे काही के. करूणाकरन किंवा जॉर्ज फर्नांडिस नव्हेत, की त्यांना संकटमोचकाचा दर्जा द्यावा. इथे वैयक्तिक टीकेचा मुद्दा नाही. पण खरेच संजय राऊतांना संकटमोचकाचा दर्जा देता येईल का…??, हा जेन्युईन प्रश्न आहे. कारण नुसत्या मातोश्री – सिल्वर ओक आणि वर्षावर फेऱ्या मारल्याने संकटमोचकाचा दर्जा प्राप्त होत नाही. त्यासाठी स्वतःचे स्वतंत्र राजकीय अस्तित्व असावे लागते. संजय राऊतांकडे ते आहे का…??, हा खरा प्रश्न आहे.

शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणाचा वरवर जरी वेध घेतला, तरी संजय राऊतांच्या राजकीय मर्यादा लक्षात येतात. उदाहरणच द्यायचे झाले, तर संजय राऊत जून महिन्यात नाशिक आणि उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येऊन गेले. त्यांनी काही नेमणूका केल्या. पण त्यामुळे शिवसेनेतली खदखद संपली नाही, उलट वाढली. मंत्री आणि जळगावचे गुलाबराव पाटील आणि एरंडोल – पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील यांच्यातील संघर्षाला धार आली.

आमदार प्रताप सरनाईक, आमदार अजय चौधरी, विजय शिवतारे आणि आमदार चिमणराव पाटील यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना शिवसेना नेतृत्वाकडे सध्या तरी उत्तर नाही. आता शिवसेना नेतृत्वाकडेच उत्तर नाही म्हटल्यावर ते संजय राऊतांकडे तरी कुठून असणार…??

शिवाय संजय राऊत आपण फक्त राज्याचे आणि देशाचे प्रश्न सोडवतोय, अशा थाटात आमदारांच्या वाढत्या खदखदीकडे दुर्लक्ष करीत आहेत. मराठी माध्यमांचे प्रतिनिधी देखील शिवसेनेतल्या गैरसोयीच्या वाटणाऱ्या खदखदीचे टोकदार प्रश्न संजय राऊतांना विचारताना दिसत नाहीत.

जे शिवसेनेतल्या खदखदीचे तेच राष्ट्रवादीच्या बाबतीत ईडीच्या कटकटीचे. २०१९ मध्ये शिवसेनेने शरद पवार, अजित पवारांवर शिखर बँक घोटाळ्यात आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. सामनाची त्यावेळची पाने जरा उलटा त्यात सगळे दिसेल. पण आज त्या प्रश्नांवर संजय राऊत आता उडवाउडवीची उत्तरे देतात. त्यांनी तशी उत्तरे देणे स्वाभाविक आहे. पण मराठी माध्यमांच्या प्रतिनिधींना काय झाले आहे टोकदार प्रश्न विचारायला…?? ते तसले प्रश्न विचारतानाच दिसत नाहीत.

अर्थात संजय राऊतांनी शिवसेनेतल्या खदखदीकडे आणि राष्ट्रवादीच्या कटकटीकडे दुर्लक्ष केले किंवा मराठी माध्यमांनी त्यांना टोकदार प्रश्न विचारले नाहीत म्हणून शिवसेना आणि राष्ट्रवादी यांची राजकीय हानी होण्याचे थांबणार नाही. ती थांबविण्यासाठी काँग्रेसच्या करूणाकरन किंवा एनडीएच्या जॉर्ज फर्नांडिसांचीच गरज लागेल. संजय राऊतांचे स्थान फारतर मुलायम सिंहांच्या काळातील समाजवादी पक्षातल्या अमरसिंहांसारखे आहे. फक्त फरक हा आहे, अमरसिंह हे page 3 सेलिब्रिटी होते. संजय राऊत हे मराठी माध्यमांचे सेलिब्रिटी आहेत…!!

Does Sanjay Raut has a real political status of “Sankatmochak” as K. Karunakaran or George Fernandis? or is he just like Amar Singh??

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात