DMK लॉटरी किंग मार्टिनची देणगी घेणार, ड्रग्स मास्टरमाईंड जावेद सादिकशी संबंध ठेणणार; तरीही DMK नेत्यांकडून सनातन धर्माच्या आदराची अपेक्षा??

वर दिलेल्या शीर्षकातून DMK बाबत क्रोनोलॉजी समझो यार, असे म्हणायची वेळ आली आहे. कारण मध्यंतरी DMK बाबत राष्ट्रीय पातळीवरच्या माध्यमांमध्ये सनातन धर्माचा अपमान याविषयी खूप मोठ्या बातम्या चालविल्या गेल्या होत्या.DMK politics : relations with lottery king Martin and drugs mafia have sadiq, you can’t expect honouring Santana dharma from DMK leaders

तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि DMK प्रमुख एम. के. स्टालिन यांचे चिरंजीव उदयनिधी स्टालिन, 2 जी घोटाळ्यातला आरोपी ए. राजा यांनी सनातन धर्माचा अपमान करणारी वक्तव्ये केली होती. सनातन धर्म म्हणजे डेंगी, मलेरिया, एड्स आहे. या सगळ्या रोगांचे जसे निर्मूलन केले, तसेच सनातन धर्माचे निर्मूलन केले पाहिजे, असे उद्गार उदयनिधी स्टालिन यांनी पेरियार अभ्यास मंडळात काढले होते. आता मुख्यमंत्र्यांचा मुलगाच सनातन धर्माचे उच्चाटन करायला निघालाय, असे म्हटल्यावर त्यांचे अनुयायी कसे मागे राहतील?? उदयनिधी स्टालिन नंतर यूपीए सरकारच्या काळातल्या 2 जी घोटाळ्याचा मुख्य आरोपी माजी केंद्रीय मंत्री ए. राजा यांनी देखील सनातन धर्माचा तसाच अपमान केला. त्यांच्यापाठोपाठ DMK च्या इतर नेत्यांनी देखील सनातन धर्माचा अपमान करण्याची फटाक्यांची माळच लावली.



त्याआधी तामिळनाडूतल्या वक्फ बोर्डचा मुद्दा माध्यमांमध्ये गाजला. तामिळनाडूत हजारो वर्षांच्या ऐतिहासिक मंदिरांच्या गावांवर अचानक वक्फ बोर्डाच्या मालकी हक्काचे बोर्ड लागलेले आढळले. त्यामुळे तिथल्या अनेकांना “जाग” आली. अनेकांनी सरकार दरबारी तक्रारी दाखल केल्या. हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले. त्यामुळे तो विषय राष्ट्रीय पातळीवरच्या माध्यमांमध्ये गाजला. पण त्याचे पुढे काय झाले हे फारसे “प्रकाशात” आले नाही. किंवा “प्रकाशात” येऊ दिले गेले नाही.

पण त्या पाठोपाठ सनातन धर्माच्या अपमानाची फटाक्यांची माळ लागली… आणि साधारण गेल्याच महिन्यात DMK पक्षाबाबतच एक धक्कादायक बातमी आली.

तामिळनाडूतला सगळ्यात मोठा ड्रग्स माफिया DMK पक्षाच्या संयोजक ए. के. जावेद सादिक याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली. तो आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या ड्रग्स माफियांकडून तब्बल 2000 कोटी रुपयांची ड्रग्स जप्त केली. ही वेगवेगळ्या ठिकाणी झालेली कारवाई होती, पण त्याचा मास्टरमाईंड सापडत नव्हता. तो मास्टरमाईंड ए. के. जावेद सादिक हा DMK पक्षाच्या एनआरआय विंगचा संयोजक निघाला. हा काही फार मोठा “योगायोग” नव्हता.

जो पक्ष ड्रग्सच्या मास्टरमाईंडशी संबंध ठेवतो, त्याला आपला एनआरआय विंगचा प्रमुख करतो, त्या पक्षाच्या नेत्यांकडून सनातन धर्माच्या सन्मानाची कशी काय अपेक्षा ठेवता येऊ शकते??, असा सवाल तयार झाला.

पण या सवालावर आणखी पुढच्या बातमीने शिक्कामोर्तब झाले, ती म्हणजे ज्या इलेक्ट्रोरल बाँड्स वरून काँग्रेस आणि मित्रपक्षांनी गदारोळ चालवला आहे, त्या इलेक्ट्रोरल बाँड्सचा सर्वांत मोठा देणगीदार लॉटरी किंग सँटियागो मार्टिन निघाला आणि त्या देणगीचा सगळ्यात मोठा लाभार्थी हा तामिळनाडूतला सत्ताधारी पक्ष DMK निघाला!! इलेक्ट्रोरल बाँड्सच्या दोन्ही याद्यांमध्ये हा सँटियागो मार्टिन हाच अव्वल देणगीदार आहे आणि लाभार्थी पक्ष देखील DMK पक्षच आहे!! DMK ला दुसऱ्या यादीत देखील 502 कोटी रुपयांचा लाभ झाल्याचे आढळून आले आहे.

मूळात DMK पक्ष हा पेरियार यांच्या सनातन विरोधी तत्त्वज्ञानावर उभारलेला आहे, त्या पक्षाचे नेते द्रविडी राजकारणाच्या नावाखाली सगळ्या सनातन धर्मियांची मते मिळवत असले, तरी ते नेते ड्रग्स माफियांशी संबंध ठेवतात, वर लॉटरी किंग कडून देणगी घेतात. ते ड्रग्स माफियाला DMK पक्षाच्या एनआरआय विंगचा मुख्य संयोजक नेमतात आणि त्यानंतर DMK पक्षाची बातमी येते, ती लॉटरी किंग सँटियागो मार्टिन याच्याकडून शेकडो कोटींची देणगी घेतल्याची!!

म्हणजे एकीकडे तामिळनाडूतल्या मंदिरांच्या हेरिटेज गावांवर वक्फ बोर्डाचा कब्जा, दुसरीकडे DMK चे ड्रग्स माफिया जावेद सादिकशी संबंध आणि तिसरीकडे लॉटरी किंग सॅटिंयागो मार्टिन याच्याकडून शेकडो कोटींची देणगी ही घटना क्रमवारी पाहता, त्या पक्षाच्या नेत्यांकडून सनातन धर्माच्या सन्मानाची कशी काय अपेक्षा ठेवता येईल??, हा खरा सवाल आहे.

DMK politics : relations with lottery king Martin and drugs mafia have sadiq, you can’t expect honouring Santana dharma from DMK leaders

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात