प्रश्न श्रेयाचा नाही, तर मुंबईकरांच्या सोयी-सुविधेचा; देवेंद्र फडणवीस


  • श्रेयासाठी काम करणे हा भाजपाचा स्वभाव नाही

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मेटो कारशेड प्रश्न श्रेयाचा नाही तर मुंबईकरांच्या सोयी सुविधेचा आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या फेसबुक लाइव्हवर प्रतिक्रिया व्यक्त करताना फडणवीस म्हणतात, की पण प्रश्न अपश्रेयाचा जरूर आहे, ते तुमच्या वाट्याला येऊ नये, हीच इच्छा! Devendra fadnavis targets uddhav Thackeray

भविष्यात कोणतीही अतिरिक्त जागा कारशेडसाठी लागणार नसताना दिशाभूल कशाला? 30 मिनिटांच्या संवादातून एक बाब प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे अजूनही आपण महाविकास आघाडी सरकारच्याच उच्चाधिकार समितीचा अहवाल पूर्णतः वाचलेला नाही. एकदा हा अहवाल सार्वजनिक करा. प्रत्यक्ष स्थिती, भूमिका, वास्तविकता महाराष्ट्राच्या जनतेसमोर येईल.

Devendra fadnavis targets uddhav Thackeray

  • या समितीनेच सांगितले की कांजूरमार्ग येथे कारशेड नेल्यास किती मोठे आर्थिक नुकसान होईल.
  • शिवाय 4 वर्षांचा विलंब वेगळा! कांजूरमार्ग येथे कारशेड करायचे असेल तरी सुद्धा आरेमध्ये बांधकाम करावेच लागेल हे का लपवून ठेवत?
  • बोगदे तयार करण्याचे काम आरेची जागा डोळ्यापुढे ठेवून करण्यात आले आहे आणि ते जवळजवळ 80 टक्के पूर्ण होत आहे.
  • आता दुसरी कोणतीही जागा निवडली तरी पैसा आणि वेळ दोन्ही वाया जाणार
  • मुंबईकरांनी आधीच खूप भोगले आहे, त्यांना आणखी त्रास नको. हा प्रश्न वैयक्तिक प्रतिष्ठेचा करू नका, ही हात जोडून विनंती आहे
Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात