अमित शहा रमले शांतिनिकेतनमध्ये रवींद्रनाथ टागोर यांना अभिवादन


विशेष प्रतिनिधी 

कोलकत्ता (वृत्तसंस्था) : राष्ट्रगीताचे निर्माते आणि गीतांजलीसाठी नोबेल पुरस्कार विजेते मिळविणाऱ्या गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या स्मृतीस केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा यांनी रविवारी अभिवादन केले. amit shah pays tribute to gurudev ravindranath tagore

बंगाल दौर्‍याच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी, शहा हे हेलिकॉप्टरने कोलकत्ताहून बोलपूरला गेले आणि थेट विश्वभारतीच्या दिशेने गेले.

बिरभूम येथील शांतिनिकेतनला शहा यांनी भेट दिली. टागोर यांना रवींद्रभवन येथे आदरांजली अर्पण केली. विश्वभारती शांतिनिकेतन विद्यापीठातील सांस्कृतिक कार्यक्रमाचा त्यांनी आनंदही लुटला.

पश्चिम बंगालमधील शांतिनिकेतन हे केंद्रीय विद्यापीठ जे नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी उभारले होते. रविवारी दुपारी विद्यार्थ्यांनी गीते व नृत्य सादर केली. दुसरीकडे राज्यातील सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेसने शहा यांचा निषेध केला.

amit shah pays tribute to gurudev ravindranath tagore

माझे भाग्य आहे की मी विश्वभारतीला भेट दिली आणि जगभरात भारताची संस्कृती, तत्वज्ञान, ज्ञान आणि साहित्य पसरविणार्‍या एका महान व्यक्तीला आदरांजली वाहिली. त्यावेळी महात्मा गांधी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस दोघांनीही टागोर यांच्याकडून प्रेरणा घेतली.

– अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर