दिल्लीत सापडल्या सापांच्या नव्या आठ प्रजाती, विद्यापीठाचे पाच वर्षे अथक संशोधन

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली –दिल्ली विद्यापीठाच्या संशोधकांनी पाच वर्षे अथकपणे परिश्रम करून सापांच्या आणखी आठ प्रजातींचा शोध लावला असून, त्यांचा दिल्लीतील सापांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे, राजधानीत आढळणाऱ्या एकूण सापांच्या प्रजातींची संख्या आता २३वर गेली आहे. हे संशोधन अमेरिकेतील ‘रेप्टाईल्स ॲंड ॲंफिबियन्स’ या नियतकालिकात प्रकाशित झाले आहे. Delhi university discovers 8 new species of snakes

दिल्लीतील सापांच्या नव्या प्रजाती असा आहेत. नानेटी (कॉमन ब्रोंझबॅक ट्री स्नेक), तस्कर (कॉमन ट्रिंकेट स्नेक), मांजऱ्या (कॉमन कॅट स्नेक), कवड्या (बॅरड वुल्फ स्नेक), मण्यार (कॉमन कुकरी), पट्टेरी मण्यार (स्ट्रिक्ड कुकरी), मांडूळ (कॉमन सॅंड बोआ) आणि फुरसे (सॉ-स्केल्ड वायपर) दिल्लीतील सापांच्या संशोधनात २३ प्रजातींच्या एकूण ३२९ सापांची नोंद करण्यात आली.



संशोधकांनी जानेवारी २०१६ ते ऑक्टोबर २०२० दरम्यान दिल्लीतील ११ जिल्ह्यांत सापांचे हे संशोधन केले. यात संशोधकांनी दिल्लीतील सार्वजनिक तसेच खासगी बागा, फार्म, मोकळ्या जमिनी, सरोवर व इतर जलस्रोंतामध्ये सापांचा शोध घेतला.

निशाचर सापांचीही माहिती जमविण्यात आली. त्याचप्रमाणे, माहिती जमविण्यासाठी विविध तंत्रांचा वापर करण्यात आला. त्याचप्रमाणे, वाइल्डलाइफ ट्रस्ट ऑफ इंडिया व इतर स्वयंसेवी संस्थांकडील सापांबाबतच्या माहितीचाही वापर करण्यात आला.

Delhi university discovers 8 new species of snakes

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात