विशेष प्रतिनिधी
मुंबई: बेंगलोरमध्ये थरंगिनी स्टुडिओ या नावाने लक्ष्मी श्रीवास्तव यांनी सिल्क साडी आणि होम फर्निशिंग फॅब्रिकचा उद्योग १९८० पासून चालवत आहेत. आजच्या काळातील फॅशन पण त्यांनी अंगिकारल्या आहेत. १९७७ साली स्थापन झालेला थरंगिनी स्टुडिओ हॅण्ड ब्लॉक प्रिंट मधील सर्वात प्रसिद्ध व आयएसओ २६००० प्रमाणित व्यवसाय आहे.
Daughter leaves us job to keep her mom’s 45 years legacy alive
लक्ष्मी श्रीवास्तव आणि त्यांची मुलगी पद्मिनी गोविंद यांनी या व्यवसायामध्ये काम केले आहे. आता हा व्यवसाय इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडियावर गाजत आहे. पद्मिनी गोविंद म्हणाल्या की, आम्ही इथे स्पर्धा करण्यासाठी आलो नाही. आम्ही कला व संस्कृतीचे प्रेमी आहोत. माझ्या आईने त्रिवेणी कला संगम या नामांकित दिल्लीतील संस्थेतून शिक्षण घेतले आहे. त्याचवेळी त्यांनी हॅण्ड ब्लॉक प्रिंटिंग चालू केले. नंतर काही वर्षांनी त्यांनी बेंगलोर मध्ये थरांगिनी स्टुडिओ चालू केला.
पुरुषांचे वर्चस्व असलेल्या टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये काम करणे सोपे नव्हते. कमलादेवी चट्टोपाध्याय इंडियन हॅंडीकॅप अंड हॅण्डलींग मधील तज्ञ त्यांना सल्लागार म्हणून लाभल्या. पद्मिनीचे वडील इंजिनिअर असून त्यांनी पण या स्वप्नपूर्तीत त्यांना मदत केली. थरंगिनी स्टुडीओ दोन टेबल व पाच कारागिरांच्या साहाय्याने सुरू झाला. सिल्क साड्या प्रिंट करून बुटिक स्टोअर्स आणि वैयक्तिक लोकांना पूरवण्यापासून त्यांनी सुरुवात केली. त्यांनी स्थानिक मार्केटवरच लक्ष केंद्रित केले होते. त्यांच्या हॅन्ड प्रिंटेड साड्यांना खूप मागणी होती. त्यांची पहिली मोठी ऑर्डर म्हणजे रॉयल नेपाळ एअरलाईन्स.
पद्मिनीला आईच्या व्यवसायाचे कौतुक असले तरी तिने कॉम्प्युटर सायन्समध्ये शिक्षण घेऊन अमेरिकेतून शिकून निरनिराळ्या कॉर्पोरेट कंपनी मध्ये काम केले. तिचा थरंगिनी स्टुडिओशी संबंध होता. २०११ ला तिच्या आईचे निधन झाले. आई आजारी असल्यामुळे ती २००८ साली भारतात परत आली होती. तोपर्यंत सिल्क इंडस्ट्रीमध्ये खूप बदल झालेला होता. चायनीज प्रकार आले होते. ब्लॉक प्रिंटिंग पेक्षा मशीन प्रिटिंग स्वस्त होते. पहिली दोन वर्षे खूप कठीण गेली.
आम्ही शांत बसणार नाही, अफगाणिस्तानातील महिला आता अजिबात अरेरावी सहन करणार नाहीत ; उद्योजिकेचे शफिक अताई यांचे वक्तव्य
आता सध्या वूड ब्लॉकचे सर्वात मोठे कलेक्शन त्यांच्याकडे आहे. खूप कारागीर त्यांच्याकडे कामाला आहेत. आता ते अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्टर्न युरोप आणि जपान येथे निर्यात करीत आहोत. युनायटेड नेशन्स कडून त्यांना ग्लोबल एको आर्टिझन स्टुडिओ कडून १० वी रँक मिळाली होती. ५९ देशांमधून ४०० स्टुडिओजनी यामध्ये भाग घेतला होता. टीम मधील कलाकारांना याचे श्रेय देण्यात आले.
भारतातील निरनिराळ्या डिझाईन कॉलेजेस बरोबर संपर्क साधून ट्रेनिंग आणि वर्कशॉप प्रोग्रॅम त्यांनी केले. कलेमध्ये आधुनिकता आणण्यासाठी त्यांनी हे केले. ते नैसर्गिक डायचा वापर करतात. ते तयार करण्यासाठी १ आठवडा ते तीन महिने लागतात. इंसुलेशनसाठी त्या न्युज पेपरचा वापर करतात. ते सर्व सुरक्षित मटेरियल वापरतात. भानू अम्मा या गेल्या ३६ वर्षापासून काम करत असलेल्या कलाकार तयार हे तयार करतात. ब्लॉक प्रिंटिंगसाठी वूडन ब्लॉकचा वापर केला जातो.
सध्या ५ अत्यंत कुशल असे ब्लॉक प्रिंटर काम करत आहेत. ते गेले ४० वर्षांपासून या व्यवसायात आहेत. यातील छोटीशी चूकपण पूर्ण कापड खराब करू शकते. ते त्यांच्या कारागिरांना एका कुटुंबातील समजतात व झालेला नफा वाटून घेतात. ते म्हणतात की परमेश्वर कृपेने आम्ही कोविड काळात सर्व कारागिरांना आधार दिला. १९९० मधे कर्नाटक स्टेट वुमन्स वेल्फेअर बोर्ड यांच्याशी संपर्क करून महिलांना फ्री ट्रेनिंग त्यांनी दिले. तसेच आशा फाउंडेशन फॉर ऑटिझम आणि नव प्रभूती ट्रस्ट यांच्याशीपण त्यांनी कोलॅबोरेशन केले आहे.
२०२२ ला या व्यवसायाचे ४५ वर्षे पूर्ण होतील. सध्या वस्त्रोद्योगात आधुनिक तंत्रज्ञान आल्यामुळे थरंगिनी स्टुडिओ आपले स्थान टिकवून आहे हे विशेष आहे. कोरोनानंतर ग्राहकांमध्ये नैसर्गिक, सेंद्रिय व हॅन्डमेड वस्तूंची मागणी वाढली आहे. इंस्टाग्राममुळे लोकांना ते खरेदी करत असलेल्या वस्तूचे व त्यामागच्या प्रोसेसचे ज्ञान मिळत असल्यामुळे आमच्या व्यवसायाला खूप फायदा झाला आहे असे पद्मिनी म्हणाल्या.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App