वृत्तसंस्था
नवी दिल्ली – संपूर्ण हिंदुस्थान तुमचा असताना खलिस्तानची बात कशाला करता, असे भावनिक आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केले आहे. यंग शीख अचिव्हर्सच्या कार्यक्रमात ते बोलत होते. country will never forget the contribution of the sikh community
राजनाथ सिंग म्हणाले, की भारताच्या हजारो वर्षांच्या संस्कृती उभारणीत आणि रक्षणात शीख समुदायाचे अतुलनीय योगदान आहे. समस्त भारतीय हे योगदान कधीच विसरू शकत नाहीत. शीखांनी आपला जाज्वल्य इतिहास सगळया भारतीयांना समजावून सांगितला पाहिजे. शीख युवकांनी आपला इतिहास समजून घेतला पाहिजे.
I would say teach your youths the history of the sikh community. This country will never forget the contribution of the sikh community. Some people demand 'Khalistan'. Why do you talk about 'Khalistan', the entire 'Hindustan' is yours: Defence Minister Rajnath Singh pic.twitter.com/PNF7XLMymk — ANI (@ANI) September 17, 2021
I would say teach your youths the history of the sikh community. This country will never forget the contribution of the sikh community. Some people demand 'Khalistan'. Why do you talk about 'Khalistan', the entire 'Hindustan' is yours: Defence Minister Rajnath Singh pic.twitter.com/PNF7XLMymk
— ANI (@ANI) September 17, 2021
‘Shining Sikh Youth of India’ या पुस्तकाचे प्रकाशन राजनाथ सिंग यांच्या हस्ते झाले. आज काही लोक स्वतंत्र खलिस्तानची मागणी करीत असतात. पण मी त्यांना आणि संपूर्ण शीख समूदायाला विचारू इच्छितो, की संपूर्ण हिंदुस्थान तुमचा – शीख समूदायाचा असताना स्वतंत्र खलिस्तानची बात कशाला करायची… शीख समूदायाचे भारताच्या इतिहास, वर्तमान आणि भविष्याच्या उभारणीत प्रचंड मोठे योगदान आहे. ते कोणीही भारतीय विसरू शकत नाहीत. शीख समूदायाने देखील ते विसरता कामा नये, असे भावनिक आवाहन राजनाथ सिंग यांनी केले.
-करतारपूर साहिब पाकिस्तानात गेले ही चूक
करतारपूर साहिब पाकिस्तानात जाऊ दिले, ही त्यावेळच्या राज्यकर्त्य़ांची चूक झाली. भारत – पाकिस्तान फाळणीच्या वेळी भारतीय नेतृत्वाने जरा जरी काळजी घेतली असती, तर आपले – शीखांचे पवित्र स्थान करतारपूर साहिब आज पाकिस्तानात गेले नसते. ते भारतातच राहिले असते, असे प्रतिपादन राजनाथ सिंग यांनी केले. राजनाथ सिंग यांच्या या वक्तव्यामुळे पंजाबमधील हिंदू, शीख समूदायाची फाळणीच्या वेदनांची वाट मोकळी झाली आहे. त्याचवेळी काँग्रेसच्या नेत्यांनी राजनाथ सिंग यांच्यावर आगपाखड करायला सुरूवात केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App