WATCH : भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ; अण्णा हजारे यांची लोकायुक्त कायद्याची हाक


विशेष प्रतिनिधी

अहमदनगर : केंद्रात ज्या पद्धतीने लोकपाल कायदा झाला. त्याच धर्तीवर राज्यात सशक्त लोकायुक्त कायदा व्हावा, या मागणीसाठी समाजसेवक अण्णा हजारे यांनी ठाकरे- पवार सरकार विरोधात आंदोलनाचा इशारा दिला.

भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, त्यासाठी सशक्त आणि स्वायत्त लोकायुक्त गरजेचा आहे. पण सरकार मागणीकडे चालढकल करत आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यात कार्यवाही केली नाही तर या सरकारकडे पाहू ,असे म्हणत अण्णांनी राज्य सरकार विरोधात आंदोलनाची तयारी सुरू केली आहे, असे राळेगणसिद्धी येथे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात आंदोलनाची तयारी सुरू करा यासाठी जिल्हा, तालुका पातळीवर कार्यकर्त्यांना सूचना देण्यात येत आहे. शांततापूर्ण आणि अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करायचे आहे, कार्यकर्त्यांनी तयारीत राहावे, असे निरोप अण्णांच्या कार्यालयाकडून राज्यभरातील कार्यकर्त्यांना दिले जात आहेत.

  •  भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे
  •  अण्णा हजारे याचा राळेगणसिद्धिमध्ये निर्धार
  •  राज्यभर आंदोलनाची दिली हाक
  •  जिल्हा, तालुका पातळीवर कार्यकर्त्यांना सूचना
  •  लोकायुक्त कायद्यासाठी धरला आहे आग्रह
  •  ठाकरे- पवार सरकारवर थेट साधला निशाणा
  •  राज्यात आता ‘मी अण्णा’च्या टोप्या झळकणार

Corruption free Maharashtra Is necessary and Must : Anna Hajare

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात