शिखा मल्होत्रा कोरोनातून पूर्णपणे सावरलेलीही नव्हती की अर्धांगवायूच्या झटक्याने तिला दुसरा धक्का बसला. पण नंतर तिने स्वतःला धीर दिला आणि पुढे जाण्याचा निर्णय घेतला.Corona Warrior Actress-to-nurse Shikha Malhotra suffers paralysis after corona, but does not waver
विशेष प्रतिनिधी
मुंबई : अभिनेत्री शिखा मल्होत्रा ’फॅन’ चित्रपटात दिसली होती. लॉकडाऊन दरम्यान, ती लोकांच्या मदतीसाठी पुढे आली. जेव्हा कोरोना महामारी भारतात झपाट्याने पसरत होती, तेव्हा तिने नर्स म्हणून ६ महिने कोविड रुग्णांची काळजी घेतली. लोकांची काळजी घेत असताना, ती स्वतः कोरोनाची बळी ठरली आणि नंतर अर्धांगवायूचा झटका आला. Corona Warrior Actress-to-nurse Shikha Malhotra suffers paralysis after corona, but does not waver
शिखाने सांगितले की, कोरोना आणि त्या पाठोपाठ आलेल्या अर्धांगवायुमुळे जीवनात वादळ आले. पण नंतर स्वतःला धीर दिला आणि पुढे जाण्याचा निर्णय घेतला.
शिखाने सांगितले की मी मुंबईत एकटिच राहते. ९ डिसेंबर २०२० रोजी आई माझ्या घरी आली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मला अर्धांगवायूचा झटका आला. सुरुवातीला उजव्या हातात जडपणा आला आणि हळूहळू चेहराही ताठ झाला. मी काही सांगण्यापूर्वीच माझा चेहरा वाकडा झाला. मला कोकिलाबेन रुग्णालयात नेण्यात आले, जिथे मला सुरुवातीला दीड लाख रुपये जमा करण्यास सांगितले गेले, मी माझ्या आईला सरकारी रुग्णालयात नेण्याचा आग्रह धरला. अखेरीस मला कूपर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. जेथे माझ्यावर पूर्ण उपचार करण्यात आले.
आजही उपचार चालू आहेत. मी हार मानली नाही. मी दिवसातून ४ वेळा व्यायाम करते. अर्धांगवायूनंतर कामाच्या ऑफर येत नाहीत. शिखा म्हणाली की लोकांना वाटत असावे की मी अजून कामासाठी तयार नाही. पण मी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहून पोस्ट शेअर करत राहते. जेणेकरून लोकांना वाटेल की मी आता काम करण्यास तयार आहे.
शिखा म्हणाली की, कोविडने मला खूप कमकुवत केले आहे. म्हणूनच मी पुन्हा रुग्णालयात पुन्हा जॉईन होऊ शकले नाही, कतरिना कैफ, शत्रुघ्न सिन्हा आणि सोनू सूदसारख्या दिग्गजांनी माझ्या कामाचे कौतुक केले तेव्हा मला खूप आनंद झाला. काही वेब सीरिजच्या ऑफर आहेत. प्रेक्षकांनी मला लवकरच पडद्यावर नवीन अवतारात पाहावे, अशी माझी इच्छा आहे.
अभिनय करण्यापूर्वी शिखाने वर्ष २०१४ मध्ये नवी दिल्लीतील वर्धमान महावीर वैद्यकीय महाविद्यालय आणि सफदरजंग हॉस्पिटलमधून नर्सिंग कोर्स केला. मात्र अभिनयामुळे ती तिचा नर्सिंग सराव पूर्ण करू शकली नाही. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शिखाने रुग्णांना स्वयंसेवक परिचारिका म्हणून सेवा देण्याचा निर्णय घेतला. यासाठी शिखाने बीएमसीची परवानगी घेतली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App