देशाच्या कर विभागातील २२९ अधिकाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यांच्या निधनावर केंद्रीय अर्थ राज्य मंत्री अनुराग ठाकूर यांनी दु:ख व्यक्तकेलेआहे. देश त्यांच्या सेवेप्रति कायमच कृतज्ञ राहिल, असे ठाकूर यांनी म्हटले आहे. Corona kills 229 tax officials in the country, Union Minister of State for Finance Anurag Thakur mourns
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशाच्या कर विभागातील २२९ अधिकाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यांच्या निधनावर केंद्रीय अर्थ राज्य मंत्री अनुराग ठाकूर यांनी दु:ख व्यक्तकेलेआहे. देश त्यांच्या सेवेप्रति कायमच कृतज्ञ राहिल, असे ठाकूर यांनी म्हटले आहे.
ठाकूर यांनी सांगितले की, कोरोनाच्या महामारीत केंद्रीय अप्रत्यक्ष करत आणि सीमा शुल्क विभागातील २२९ अधिकाºयांचा मृत्यू झाला. यामध्ये सीमा शुल्क विभागातील ११० अधिकारी आणि केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाच्या ११९ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
ठाकूर यांनी म्हटले आहे की, संकटाच्या काळात राष्ट्राची सेवा करण्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावली. देश कायमच त्यांच्याप्रति कृतज्ञ राहिल. सरकार त्यांच्या कुटुंबाच्या दु:खात सहभागी आहे. त्यांना शक्य तितकी सर्व मदत करण्यात येईल. आपल्या सेवेमुळेच देशातील विविध बंदरांवर ऑक्सिजन सिलेंडर आणि इतर वैद्यकीय उपकरणांना वेगाने बाहेर काढता आले. या अधिकाºयांच्या सेवेमुळेच सरकारी यंत्रणेची चाके सुरळित चालू आहेत. कोरोना महामारीचा सर्वाधिक फटका अर्थ मंत्रालयाला बसला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App