विद्यापीठांना परिषदेस पाठिंबा न देण्याचे आवाहन, परिषदेत सहभागी नक्षलसमर्थकांविरोधात मोहीम
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : हिंदुत्वद्वेष्ट्यांनी अमेरिकेत आयोजित करण्यात केलेल्या ग्लोबल हिंदुत्व डिसमँटल परिषदेविरोधात आता अमेरिकेतील हिंदू समुदाय एकवटला आहे. या परिषदेस अमेरिकेतील विद्यापीठांनी पाठिंबा देऊ नये यासाठी ‘डिसमेंट्ल हिंदूफोबिया’ मोहीम सुरू केली आहे. तिला अमेरिकेसह युरोप आणि कॅनडामधील हिंदू समूदायाचाही मोठा पाठिंबा मिळतो आहे. Coalition of Hindu’s in North America opposed “Dismantaling Global Hindutva Conference”
‘कोएलिशन ऑफ हिंदुज ऑफ नॉर्थ अमेरिका – सीओएचएनए’ या अमेरिकेतील हिंदुंच्या संघटनेने हिंदुत्वद्वेष्ट्यांचा अजेंडा हाणून पाडण्याची तयारी केली आहे. या संघटनेने ‘डिसमेंट्ल हिंदूफोबिया’ अशी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेतून हिंदुत्वद्वेष्ट्याच्या वादग्रस्त परिषदेस प्रायोजकत्व देणाऱ्या, आयोजनामध्ये सक्रिय सहभाग घेणाऱ्या आणि आयोजनाची परवानगी देणाऱ्या विद्यापीठांना परिषदेस पाठिंबा देण्यावपासून परावृत्त करण्यात येत आहे. विद्यापीठांनी स्पॉन्सररशीप रद्द करावी, असा आग्रह हिंदूंच्या संघटनेने धरला आहे.
या परिषदेच्या आयोजनाद्वारे हिंदुत्वाविषयी व्देष अर्थात फोबिया निर्माण करण्याचा आयोजकांचा प्रयत्न असल्याचे अमेरिकेतील हिंदूंचे मत आहे. हिंदुत्व विरोधकांची परिषद संपूर्ण हिंदू समाजाला आक्रमक आणि हिंसक म्हणून रंगविण्याचा प्रयत्न करीत असून त्यामुळे अमेरिकेसह जगभरात हिंदूफोबिया पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. धक्कादायक म्हणजे ९/११ च्या हल्ल्यास २० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. याद्वारे अल् कायदा, तालिबान आणि जगातील सर्व दहशतवादी संघटनांना हिंदुत्वासोबत जोडण्याचा संतापजनक प्रकार केला जात असल्याचेही अमेरिकेतील हिंदूंनी म्हटले आहे.
-हिंदुत्व विरोधकांच्या परिषदेमध्ये सहभागी होणार नक्षलप्रेमी
‘कोअलिशन ऑफ हिंदुज ऑफ नॉर्थ अमेरिका’ या संघटनेने परिषदेत नक्षलप्रेमी आणि हिंदुविरोधी वक्त्यांचा समावेश असण्याकडेही लक्ष वेधले आहे. नक्षली हिंसेची समर्थक आणि माकप माओवादी पक्षाची पदाधिकारी कविता कृष्णन, हिंदूविरोधी पत्रकार नेहा दीक्षित, नक्षलवाद्यांसाठी म्होरकी म्हणून काम करणारी नलिनी सुंदर, हिंदुविरोधी दिग्दर्शक आनंद पटवर्धन आणि हिंदू देवीदेवतांविषयी अश्लाघ्य लिखाण करणारी लेखिका मीना कंदासामी हे या परिषदेत सामील होणार आहेत. त्यांच्या समावेशाल अमेरिकेतील हिंदू संघटनेचा तीव्र विरोध आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App