चीन- पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरमधून चीन बाहेर


विशेष प्रतिनिधी 

बीजिंग : चीनला जगाची बाजरपेठ बनवायचे आहे. त्यासाठी वाहतूक व्यवस्था बळकट करण्याचे अनेक प्रकल्प चीनने सुरु केले आहेत. परंतु आता चीन- पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरमधून (CPEC) प्रकल्पातून चीन काढता पाय घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. China slowly retreating from Pakistan’s Belt

या प्रकल्पावर चीनने 60 दशलक्ष डॉलर उधळले आहेत. त्याशिवाय एक क्षेत्र आणि एक रोड या तत्वानुसार आखातातून तेल चिनमध्ये आणण्यासाठी रस्ते, समुद्र आणि हवाई वाहतुकीचे जाळे निर्माण कारण्यासाठी 70 देशांशी करार केले आहेत. त्यात पाकिस्तानचाही समावेश आहे. China slowly retreating from Pakistan’s Belt

परंतु प्रकल्पाला विरोध होत असून चिनी अभियंत्यावर हल्लेही झाले आहेत. त्यात वाहतूक प्रकल्पात भ्रष्टाचार, निकृष्ट साहित्याचा वापर, कामात दिरंगाई, आर्थिक चणचण, फुगलेली कर्जे यामुळे पाकिस्तानातील हा प्रकल्प लांबत चालला आहे. दुसरीकडे चिनी अभियंत्यावरील हल्ले रोखण्यासाठी पाकिस्तानी सैन्याने प्रकल्प देखरेखीसाठी ताब्यात घेतले जाणार आहेत. त्यासाठी संसदेत मंजुरी दिली जाणार आहे.

जगभरात आतापर्यंत 122 पैकी 32 इकॉनॉमिक कॉरिडॉर प्रकल्प पूर्ण झाले आहेत. पाकिस्तानातील प्रकल्प हा विजेच्या संबंधित कंपनीच्या भ्रष्टाचारामुळे रेंगाळत चालला आहे. त्यामुळे कंपनीचे अर्थसाहाय रोखले आहे.

China slowly retreating from Pakistan’s Belt

बलुच प्रांतात रोडे

चीन- पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर हा प्रकल्प पाकिस्तानच्या बलुच प्रांतातून जातो. तेथील लोकांना हा प्रकल्प मंजूर नाही. त्यामुळे प्रकल्पावर वारंवार हल्ले केले जातात. त्यामुळे पाकिस्तान आणि चीन दोघेही कात्रीत सापडले आहेत.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात