मोदी सरकारने केले गुप्तचरांचे जाळे आणखी भरभक्कम; नवीन ४५१ केंद्रांतून होणार माहिती गोळा


विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दहशतवादविरूद्ध लढा देण्याची क्षमता वाढविण्याच्या उद्देशाने भारताची इंटेलिजेंस ब्युरो (आयबी) आपले मल्टी-एजन्सी सेंटर (मैक) नेटवर्क जिल्हा पातळीवर वाढवित आहे.
आयबीच्या मॅक नेटवर्कमध्ये आता देशभरातील  ८२५ ठिकाणे असतील. Modi government’s intelligence network is even stronger
कारगिल संघर्षानंतर डिसेंबर २००१ मध्ये तयार करण्यात आलेल्या ‘मॅक’च्या नेटवर्कमध्ये सध्या ३७४ ठिकाणांचा समावेश आहे. दहशतवादाशी संबंधित सर्व गुप्तचर माहिती सामायिक करणे आणि त्यांचे विश्लेषण करण्यासाठीची विशेष यंत्रणा  म्हणून ‘मॅक’ची स्थापना करण्यात आली. राज्य पोलिस प्रमुखांशी सल्लामसलत करून हे नेटवर्क आता निवडक ४५१ जिल्ह्यांपर्यंत वाढविण्यात येणार आहे.
एनएमबी सॉफ्टवेअर सर्व मॅक आणि राज्य पोलिस सर्व्हरवर वापरण्यात आले आहे. इंटेलिजेंस ब्युरो आणि इतर काही राज्यांसह इतर अनेक एजन्सींकडून डेटाबेसवर मोठ्या प्रमाणात डेटा आधीच अपलोड केला गेला आहे.

Modi government’s intelligence network is even stronger

याव्यतिरिक्त, ‘मॅक’ संबंधित एजन्सींकडून सरासरी दररोज अंदाजे १५० इनपुट संकलित करते, स्टोअर करते आणि सामायिक करते. त्यानंतर संबंधित इंटेलिजन्स इनपुट पाठविण्यात येते.
Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात