मुख्यमंत्री ठाकरेंची परदेशात अवैध संपत्ती ; सगळी माहिती ED आणि CBI ला देणार ; रवी राणा


  • आमदार रवी राणा यांनी केले मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
  • ईडी आणि सीबीआयकडं तक्रारी करण्याचा दिला इशारा

विशेष प्रतिनिधी

अमरावती: अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघाचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ठाकरे यांनी विसरू नये की, त्यांनी परदेशात जी अवैध पद्धतीने संपत्ती जमा केली आहे ज्यामध्ये हॉटेल, जमिन, घर आहे या सगळ्याची माहिती मी ED ला देणार आहे. त्यांच्या ह्या संपत्तीविषयी कागदपत्रासह सर्व माहिती ED आणि CBI ला देणार आहे. असं वक्तव्य रवी राणा यांनी केलं आहे.Chief Minister Thackeray’s illicit assets abroad; All information will be given to ED and CBI: Ravi Rana

अमरावतीच्या खासदार नवनीत कौर-राणा यांना शिवसेना टार्गेट करत असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. ‘उद्धव ठाकरे हे द्वेषाचे राजकरण करत असून वेगवेगळ्या कारणाने ते माझ्या पत्नी नवनीत राणा व मला टार्गेट करत आहेत.

याचवेळी रवी राणा यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर देखील निशाणा साधला. अनिल परब यांच्या देखील अवैध रिसॉर्टची माहिती मी कागदपत्रासह ED ला देणार असल्याचं यावेळी त्यांनी म्हटलं आहे.

जेव्हापासून नवनीत राणा यांनी अमरावती मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून शिवसेना नेते आनंद अडसूळ यांनी त्यांच्या तक्रारी केल्या. अनुसुचित आयोगाकडे तक्रार केल्या. त्या ठिकाणी त्या जिंकल्या. पण असं असताना हायकोर्टाने अचानक असा निर्णय देणं हा मोठा धक्का होता. त्या संदर्भात आम्ही सुप्रीम कोर्टात न्याय मागितला. ज्यानंतर सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती दिली. जो आमच्यासाठी मोठा दिलासा आहे.

मी स्वत: उद्धव ठाकरे यांची अवैध संपत्ती आहे जी इतर वेगवेगळ्या देशात आहे. त्या संपत्तीची पूर्ण माहिती घेतलेली आहे. ज्या ठिकाणी त्यांचे हॉटेल आहे, ज्या ठिकाणी त्यांच्या जमिनी आणि घर आहे अशा ठिकाणची माहिती घेतलेली आहे आणि ईडी आणि सीबीआयला याची सविस्तर माहिती देणार आहे. त्यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे अशी मी मागणी करणार आहे.

Chief Minister Thackeray’s illicit assets abroad; All information will be given to ED and CBI: Ravi Rana

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती