प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे होत आहेत, त्यानिमित्ताने केंद्र सरकारने हे वर्ष अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करत आहेत. वर्षभर कार्यक्रमाचे आयोजन करीत आहे. त्यासाठी विविध खात्यांनी अमृत महोत्सवाचे बॅनर बनवले आहेत. असाच एक बॅनर भारतीय इतिहास अनुसंधान परिषदेने बनविला आहे. त्यामध्ये स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख नेत्यांचे फोटो छापण्यात आले आहेत. त्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा फोटो छापून त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. मात्र यामुळे अनेकांना पोटशूळ उठला, त्यामुळे ‘सावरकर’, ‘नेहरू’ असा ट्विटरवर ट्रेंड दिवसभर होता. Central government publication printed Savarkar image on poster irked Congress
– कसा आहे ‘तो’ बॅनर?
या बॅनरमध्ये महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर, भगतसिंग, सरदार वल्लभभाई पटेल, आणि डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे फोटो आहेत. भारतीय इतिहास अनुसंधान परिषदेच्या संकेतस्थळावर हा बॅनर झळकला आहे. स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख नेत्यांमध्ये वीर सावरकरांचा समावेश करून त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यामुळे अनेकांच्या पोटात पोटशूळ उठला आहे. त्यावर लगेचच ट्विटरवर ‘सावरकर’ असा ट्रेंड ट्विटरवर सुरु झाला. त्यावर राष्ट्रप्रेमी नागरिकांनी त्याचा सडेतोड भाषेत समाचार घेतला. हिंदुस्थन पोस्टने ही बातमी दिली आहे.
NEHRU WAS RELEASED FROM JAIL ONLY AFTER HE SIGNED BOND THAT HE’D NEVER ENTER NABHA AGAIN PIC.TWITTER.COM/0XZOPCPJXR
— VINAYAK SHARMA (@VINAAYAKSAYS) AUGUST 28, 2021
– जवाहरलाल नेहरूंचा फोटो नसल्याने पोटशूळ!
या बॅनरमध्ये जवाहरलाल नेहरू यांचा फोटो छापण्यात आला नाही. त्यामुळे काँग्रेसच्या समर्थकांची पोटदुखी सुरु झाली. त्यामुळे ते वीर सावरकरांचा फोटो का छापला?, अशी विचारणा करून जवाहरलाल नेहरूंचा फोटो न छापल्याने जो संताप निर्माण झाला, ते वीर सावरकरांना विरोध करून शांत करत होते.
भारताच्या स्वातंत्र्याचे अग्रगण्य जवाहरलाल नेहरू यांना वगळून स्वतंत्रच अमृत महोत्सव साजरा करणे हे चुकीचे आणि अनैतिहासिक आहे. भारतीय इतिहास अनुसंधान परिषदेचा स्वतःला बदनाम करण्याचा हा आणखी एक प्रसंग. ही त्यांची एक सवय बनली आहे!, असा आरोप असे काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी केला.
काँग्रेसच्या विचार मांडण्याआधी लक्षात घ्या, देशासाठी अनेकांचे योगदान आहे. कुणीही कुणाचे योगदान नाकारू शकत नाही. त्यामुळे आपण खुल्या मनाने स्वीकारावे, असे नेटिझन्स म्हणतात.
देशप्रेमी भारतीय या नात्याने मी आनंदी आहे, ज्यांनी त्याग केला त्यांना अखेर सन्मान मिळाला. दीर्घकाळानंतर हे घडले.
AS A PROUD INDIAN I AM EXTREMELY HAPPY TO SEE DESERVING PEOPLE GETTING THEIR DUES FINALLY. SHOULD HAVE BEEN DONE LONG TIME AGO
— GARIMA AGRAWAL (@GARIMAG27) AUGUST 27, 2021
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App