शिवराज्याभिषेक सोहळा घरीच साजरा करा, पुढील दिशा राजसदरेवरुन घोषित करेल, खासदार संभाजीराजे छत्रपती यांचे आवाहन


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रायगडावर शिवभक्तांची गर्दी राष्ट्रहिताच्या दृष्टीने घातक असेल. त्यामुळे शिवभक्तांनी घरीच राहून शिवराज्याभिषेक साजरा करावा असे आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे. सर्वांच्या न्यायाची बाजू व पुढील दिशा, ठरल्याप्रमाणे मी राजसदरेवरुन घोषित करेन असे त्यांनी सांगितले आहे. Celebrate Shiv Rajyabhishek Sohala at home, next direction will be announced from Rajsadar, MP Sambhaji Raje Chhatrapati’s appeal


विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रायगडावर शिवभक्तांची गर्दी राष्ट्रहिताच्या दृष्टीने घातक असेल. त्यामुळे शिवभक्तांनी घरीच राहून शिवराज्याभिषेक साजरा करावा असे आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे. सर्वांच्या न्यायाची बाजू व पुढील दिशा, ठरल्याप्रमाणे मी राजसदरेवरुन घोषित करेन असे त्यांनी सांगितले आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी पुढील दिशा शिवराज्याभिषेक दिनी घोषित करण्यात येणार आहे असे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले होते. या पाश्र्वभूमीवर त्यांनी फेसबुक पोस्टवर समाजाला आवाहन केले आहे.

फेसबुक पोस्टमध्ये खासदार संभाजीराजे यांनी म्हटले आहे की, मनामनात फुललेला शिवभक्तीचा सागर, उत्साहाचा क्षण, जल्लोषाचा परमोच्च बिंदू, भिरभिरणारे भगवे ध्वज, ढोल-ताशाने दुमदुमणाऱ्या कडे-कपाऱ्या अन् शिवछत्रपतींच्या अखंड जयघोषाने दणाणणारा दुर्गराज रायगड असतो. लाखो शिवभक्तांची हजेरी व सोहळ्याला चढलेला लोकोत्सवाचा साज आपण पाहतो. ५ व ६ जूनला थाटामाटात हा सोहळा प्रतिवर्षी साजरा होतो. गतवर्षी प्रमाणे यावर्षीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रायगडावर शिवभक्तांची गर्दी राष्ट्रहिताच्या दृष्टीने घातक असेल. तसेही सरकार ने केवळ २० लोकांनाच गडावर जाण्याची परवानगी दिली आहे. यंदा सुद्धा “शिवाजी महाराज मनामनात, शिवराज्याभिषेक घराघरात” साजरा करणे, ही जबाबदार शिवभक्ताची ओळख ठरेल.

गतवर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शिवप्रेमींना दुर्गराज रायगडावर न येता राज्याभिषेक सोहळा विधायक उपक्रम राबवून आपल्या घरातच साजरा करण्याचे आवाहन केले होते. सर्व शिवभक्तांनी माझ्या या विनंतीला मान दिला. तसेच, निसर्ग वादळ आणि कोरोनाचे आव्हान असताना, आपल्या राज्याभिषेक सोहळ्याच्या परंपरेला खंड पडू देणार नाही, हा शब्द मी सर्वांना दिला होता. तो मी पूर्ण केला.



दुर्दैवाने यावर्षीही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. त्यामुळे यावर्षीचाही राज्याभिषेक सोहळा सर्वांनी घरात राहूनच साजरा करण्याचे आवाहन मी पुन्हा करत आहे. स्वराज्यातील नियम स्वतः छत्रपती शिवाजी महाराज सुध्दा पाळत असत. आपण त्यांच्याच आदर्शांवर चालणारे सच्चे शिवभक्त आहोत. सर्व शिवभक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी रायगडावर जाऊन आपल्या सर्वांच्या वतीने सोहळा अखंडीतपणे साजरा करण्याची जबाबदारी घेणार आहे. माझ्यासाठी आपला सर्वांचा जीव महत्वाचा आहे ; यासाठी आपण घरीच थांबावे. तुम्हा सर्वांच्या न्यायाची बाजू व पुढील दिशा, ठरल्याप्रमाणे मी राजसदरेवरुन घोषित करेन.

Celebrate Shiv Rajyabhishek Sohala at home, next direction will be announced from Rajsadar, MP Sambhaji Raje Chhatrapati’s appeal

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात