
- भाजप खासदार नारायण राणे जे. पी. नड्डा यांची भेट
- शिवसेना खासदार अरविंद सावंत हे मोदींच्या मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्री होते मात्र महाराष्ट्रात युती तुटल्यानंतर अरविंद सावंत यांनी केंद्रातील मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून या पदाचा भार प्रकाश जावडेकर यांच्याकडे आहे.
- महाराष्ट्रातून नारायण राणे, प्रीतम मुंडे यांची नावे चर्चेत.
विशेष प्रतिनिधी
मुंबई: केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.भाजपचे राज्यसभेचे खासदार नारायण राणे हे दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर नारायण राणे दिल्लीला गेल्याने त्यांना केंद्रात स्थान मिळणार का? या चर्चा सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांचा दिल्ली दौरा महत्त्वाचाही मानला जातो आहे. नारायण राणे हे दिल्ली दौऱ्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेणार आहेत.नारायण राणेंना मंत्रिमंडळात स्थान मिळतं का ? मिळालं तर काय पद मिळणार? या सगळ्या चर्चाही आता सुरू झाल्या आहेत.Cabinet Reshuffle: Narayan Rane leaves for Delhi; Will he get a place in the Union Cabinet?
नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनाच्या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कोकणात आले होते. नारायण राणे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. भाजपमध्ये आल्यानंतर नारायण राणे यांनी शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. काही दिवसांपूर्वीच त्यांनी कोरोना हाताळणीत महाराष्ट्राने कशी परिस्थिती हाताळली नाही हे सांगत आणि वाढीव वीज बिलांवरून तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर टीका केली होती. अशात मराठा आरक्षणाचा मुद्दा हा राज्यात गाजतो आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रीमंडळात नारायण राणे यांना स्थान दिलं जाऊ शकतं या चर्चा सुरू झाल्या आहेत.
अरविंद सावंत यांनी केंद्रातील मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून या पदाचा भार प्रकाश जावडेकर यांच्याकडे आहे.
महाराष्ट्राच्या वाट्याला आलेलं हे पद रिक्त आहे त्यामुळे या पदीही नारायण राणे यांची वर्णी लागू शकते का?
काही दिवसांपासून पंतप्रधान मोदी हे मंत्र्यांच्या छोट्या-छोट्या गटाला बोलावून त्यांची भेट घेत आहेत. यावेळी त्या-त्या मंत्र्याच्या संबंधित मंत्रालयांचा आढावा देखील ते घेत असल्याचे सूत्रांनी सांगितलं आहे. पंतप्रधान मोदी यांच्यासह भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा आणि अमित शाह हे देखील बैठकीला हजर होते.
शनिवारी धर्मेंद्र प्रधान, नरेंद्रसिंग तोमर, गजेंद्रसिंग शेखावत, महेंद्र नाथ पांडे, हरदीप पुरी यांच्या मंत्रालयांच्या कामाचा आढावा घेतला गेला.
यापूर्वी व्ही.के. सिंग आणि अन्य मंत्र्यांची देखील पंतप्रधानांनी आढावा बैठक घेतली आहे.