सोन्याची कोंबडी असलेल्या गोकुळ दूध उत्पादक संघावर वर्चस्व मिळविण्यासाठी गृह राज्य मंत्री सतेज पाटील आणि ग्राम विकास मंत्री हसन मुश्रिफ यांनी राजकीय समीकरण जुळविले. ऐन कोरोनाच्या काळात निवडणुका घेतल्या. पण त्यामुळे कोल्हापूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोल्हापूरच्या जनतेलाच इशारा द्यावा लागला.Satej Patil-Hasan Mushrif gains in Gokul polls, But the eruption of Corona struck Kolhapur residents
प्रतिनिधी
कोल्हापूर : सोन्याची कोंबडी असलेल्या गोकुळ दूध उत्पादक संघावर वर्चस्व मिळविण्यासाठी गृह राज्य मंत्री सतेज पाटील आणि ग्राम विकास मंत्री हसन मुश्रिफ यांनी राजकीय समीकरण जुळविले. ऐन कोरोनाच्या काळात निवडणुका घेतल्या. पण त्यामुळे कोल्हापूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोल्हापूरच्या जनतेलाच इशारा द्यावा लागला.
कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यावर राज्यात बरेचसे जिल्हे लॉकडाऊन करण्यात आले. पण कोल्हापूरच्या पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत असतानाही गोकुळ ची निवडणूक घेण्याचा अट्टाहास केला. मतदाना दिवशी शेकडोंच्या संख्येने एकत्र मतदार सोबत घेऊन शक्तिप्रदर्शनही केलं.
कोरोना नियमांची पायमल्ली केली. त्यांच्यासोबतच मंत्री हसन मुश्रीफ आणि अन्य बडे नेतेही होते. यानंतर निवडणूक निकाल लागेपर्यंत म्हणजेच ४ मे पर्यंत जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले नव्हते. निकाल लागताच सायंकाळी कडक लॉकडाऊनचे आदेश काढण्यात आले
राज्याच्या इतर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली असली तरी कोल्हापूर जिल्ह्याची परिस्थिती अजूनही जैसे थे आहे. जिल्ह्यात दिवसाला जवळपास दीड हजारांच्या आसपास नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. दररोज किमान तीस जणांचा मृत्यू होत आहे.
कोल्हापूर जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 15 टक्क्यांहून अधिक आहे. मृत्यूचे प्रमाण देखील तीन टक्क्यांपर्यंत आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची अपुरी यंत्रणा, टेस्टिंगचे वाढलेले प्रमाण, त्याचबरोबर बाहेरील जिल्ह्यातून कोल्हापुरात उपचारासाठी येणारे रुग्ण, अशी काही कारण जिल्ह्यातील रुग्ण वाढीसाठी दिसत आहेत.
अजित पवार यांनी कोल्हापूरमध्ये कोरोनाची बैठक घेतली. कोल्हापूर जिल्हा हा अनलॉकच्या चौथ्या स्तरात आहे. त्यामुळे नियम शिथिल केले जाणार नाहीत. उलट गरज पडल्यास नियम अधिक कडक केले जातील, असा इशारा दिला. अजित पवार म्हणाले,कोरोना संसगार्ची दुसरी लाट ओसरायला लागली आहे,
मात्र कोल्हापुरात वातावरण अजूनही तसंच आहे. पहिल्या लाटेत कोल्हापुरात कोरोना आटोक्यात आणला होता. परंतु कोल्हापुरात कोविड पॉझिटिव्हिटीचा रेट सर्वाधिक आहे. सध्या हा जिल्हा अनलॉकच्या चौथ्या स्तरात आहे. त्यामुळे नियम शिथिल केले जाणार नाहीत.
उलट नियम अधिक कडक केले जातील. कोल्हापूरकरांनी सहकार्य करणं गरजेचं आहे. नागरिक अजूनही मास्क वापरत नसल्याचे समोर येत आहे. जिल्ह्यात कोरोनाला आळा घालण्यासाठी गृह विलगीकरण कमी करुन संस्थात्मक विलगीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more