झाडांच्या फांद्या छाटल्याने पक्ष्यांचा पिल्लांचा मृत्यू ;पश्चिम कल्याणमधील दुर्दैवी घटना

 

मुंबई : कल्याण पश्चिम भागातील अनुपनगर येथील झाडांच्या फांद्या छाटण्यात आल्याने पक्ष्याचाच २० पिल्लांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली. याकडे वाईल्ड लाईफ ऍनिमल अँड रेपटाईल्स रेस्क्यू या संस्थेने कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. By pruning tree branches Death of २० Birds chicks

संस्थेच्या कार्यकर्त्यांनी ११ पिल्लांची सुटका करुन त्यांच्यावर उपचार करुन त्यांना चारा देण्याचे काम केले आहे. ही पिल्ले बरी होता. त्यांना वन खात्याच्या माध्यमातून वनात सोडण्यात येणार आहे , अशी माहिती संस्थेच्या कार्यकर्त्या फाल्गुनी दलाल य़ांनी दिली आहे. यापुढे महापालिकेने पावसाळ्यापूर्वी झाडांच्या फांद्या तोडताना काळजी घेतली पाहिजे, असा सल्ला दिला आहे.

  •  डोंबिवली महापालिकेने झाडांच्या फांद्या छाटल्या
  •  पश्चिम कल्याणमधील पक्ष्यांचा २० पिल्लांचा मृत्यू
  •  ११ पिलांची सुटका करुन त्यांच्यावर उपचार
  •  वाईल्ड लाईफ ऍनिमल अँड रेपटाईल्स रेस्क्यूने लक्ष वेधले
  •  पलिकांना फांद्या तोडताना काळजी घेण्याचा सल्ला

महत्त्वाच्या बातम्या