
प्रतिनिधी
चिपळूण : नैसर्गिक आपत्ती वादळ पुर यांचे व्यवस्थापन करण्याचे काम मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे आहे त्यांनी दौऱ्यावर जाणे योग्य इतरांनी दौऱ्यावर जाऊन तेथील प्रशासकीय कामात अडथळा येतो इतरांनी दौरे टाळावेत असा उपदेश राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला खरा पण तो त्यांच्याच नातवाने उधळून लावला आहे By defying sharad pawar his grandson MLA rohit pawar is on flood affected area tour
कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती आल्याने अनेकांचे संसार उध्वस्त झाले. याचमुळे आता या भागात राजकीय नेत्यांचे पाहणी दौरे देखील सुरू झाले असून, राजकारण देखील रंगले आहे. मात्र राजकीय नेत्यांच्या या दौऱ्यांवर शरद पवार यांनी नाराजी व्यक्त करत, नेत्यांनी असे दौरे करणे टाळायला हवे, असे म्हटले होते. मात्र शरद पवारांच्या या आवाहनाला त्यांचे नातू आणि कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनीच छेद दिला आहे. रोहित पवार हे आज पूरस्थिती झालेल्या भागांची पाहणी करण्यासाठी गेले. त्याचमुळे आजोबांचे नातूही ऐकेना, अशी टीका आता राजकीय वर्तुळातून होऊ लागली आहे.
कऱ्हाड, पाटण तालुक्यात निर्माण झालेली पूरस्थिती व भूस्खलन भागाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार रोहित पवार हे देखील आज दौऱ्यावर आले.
चिपळूण तालुक्यातील पेढे ह्या गावात अतिवृष्टीमुळे काही घरांवर दरड कोसळून झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला व काही जण गंभीर जखमी आहेत. आज आमदार रोहित पवार यांनी पेढे ह्या गावी भेट देऊन पीडित कुटुंबाचे सांत्वन केले. यावेळी सोबत राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार शेखर निकम उपस्थित होते. तर रोहित पवार हे गुरुवारी कोल्हापूर आणि सांगलीचा दौरा करणार असून, गुरुवारी सायंकाळी ते वाई येथे भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन, नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
– काय म्हणाले होते शरद पवार?
नेत्यांच्या पाहणी दौ-यांवर शरद पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत टीका केली होती. पूरग्रस्त भागांची पहाणी करण्यासाठी अनेक नेते दौरे करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या भागांचा दौरा केला. पूरग्रस्त भागांतील परिस्थितीची माहिती घेण्यासाठी आणि लोकांना दिलासा देण्यासाठी त्यांना दौरे हे करावेच लागतात. पण इतर नेत्यांनी असे दौरे करुन गर्दी करू नये. तेथील लोकांना मदत करणे हे जास्त गरजेचे आहे. त्यामुळे आपल्या दौ-यांमुळे तेथील व्यवस्थेवर ताण पडणार नाही याची काळजी इतर नेत्यांनी घ्यावी, असे शरद पवार म्हणाले होते.
पण पवारांचे म्हणणे इतर नेत्यांनी ऐकण्याचे तर सोडाच खुद्द त्यांचे नातू रोहित पवार यांनीही मनावर घेतले नसल्याचे त्यांच्या पूरग्रस्तांच्या दौऱ्यावरून स्पष्ट होते आहे.
By defying sharad pawar his grandson MLA rohit pawar is on flood affected area tour
महत्त्वाच्या बातम्या
- केरळ होतोय वेगाने म्हातारा, २० टक्केंहून अधिक जनता ज्येष्ठ नागरिक
- उर्जामंत्र्यांच्या डिबेटनंतर गोवा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री एकमेंकांशी भिडले, राजकीय फायद्यासाठी आमच्या महान नेत्यांचा केलेला अपमान सहन केला जाणार नाही
- जगन्नाथाची भूमी पूरीमध्ये युरोप, अमेरिकेइतकेच शुध्द पाणी, अडीच लाख लोकसंख्येला नळाने शुध्द पाणीपुरवठा
- आप पंजाबमध्ये स्वबळावरच लढणार, कोणत्याही राजकीय पक्षाशी युती करणार नाही
- बी. एस. येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यामुळे व्यथित होऊन समर्थकाची आत्महत्या