शरद पवार यांचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरविला पण त्याचा परिणाम होणार अमित शहा यांच्या अधिकारावर


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी मंत्री असतानाचा शरद पवार यांचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. मात्र, त्यामुळे मोदी सरकारच्या निर्णयावर परिणाम होणार आहे. केंद्र सरकारने नुकतेच केंद्रीय सहकार मंत्रालय सुरू केले आहे. मात्र, न्यायालयाच्या निर्णयानुसार सहकार हा विषय हा राज्यसूचीतील असल्याने केंद्रीय पातळीवर निर्णय घेण्यासाठी निम्याहून अधिक राज्यांची परवानगी लागणार आहे.Sharad Pawar’s decision was quashed by the Supreme Court but it will affect Amit Shah’s authority

देशातील सहकारी संस्थांच्या बाबतीत राज्य विधिमंडळांचे अधिकार मर्यादित करणारी ९७ वी घटनादुरुस्ती शरद पवार कृषीमंत्री असताना २०११ मध्ये करण्यात आली होती. यानुसार, राज्यातील सहकार संस्थांविषयी नियम किंवा निर्णय घेण्याच्या राज्य विधिमंडळांच्या अधिकारांवर मोठ्या प्रमाणावर बंधनं घालण्यात आली होती.



मात्र, घटनेच्या राज्य सूचीमध्ये कोणताही बदल करण्यासाठी देशातील किमान निम्म्या राज्यांच्या विधिमंडळांची त्यासाठी परवानगी आवश्यक असते, असे नमूद करत सर्वोच्च न्यायालयाने ९७व्या घटनादुरुस्तीचा ९बी हा हिस्सा रद्दबातल ठरवला आहे. यासंदर्भात गुजरात उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रोहिंटन नरीमन, न्यायमूर्ती के. एम. जोसेफ आणि न्यायमूर्ती बी. आर गवई यांच्या तीन सदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. यावेळी पूर्ण खंडपीठाने ९७व्या घटना दुरुस्तीचा ९बी हा भाग फक्त रद्द ठरवला असताना न्यायमूर्ती के. एम. जोसेफ यांनी पूर्ण ९७वी घटनादुरुस्तीच रद्द करण्याविषयी आपला निर्णय दिला आहे.

गुजरात उच्च न्यायालयाने ९७व्या घटनादुरुस्तीच्या ९बी या भागामध्ये नमूद असलेल्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर आक्षेप नोंदवला होता. या घटनादुरुस्तीनुसार सहकारी संस्थांसंदर्भात कायदे किंवा नियम बनवण्याच्या अधिकारांवर मोठ्या प्रमाणार निर्बंध आणले गेले.

यात सहकारी संस्थांवर नेमण्यात येणाऱ्या संचालकांची संख्या २१ पर्यंत मर्यादित करणे, बोर्ड सदस्य आणि पदाधिकाऱ्यांची कार्यकाळ मुदत ५ वर्षांपर्यंत करणे, निवडणुका घेण्यासंदभार्तील नियम, किती काळानंतर ऑडिट करायला हवं त्यासंदभार्तील नियम हे घटनादुरुस्तीच्या माध्यमातून निश्चित करण्यात आले. यासोबतच, सहकारी संस्थांच्या संदर्भात कोणत्या बाबी गुन्हा ठरू शकतील, हे देखील निश्चित करण्यात आलं.

सर्वोच्च न्यायालयाने ९७व्या घटनादुरुस्तीचा ९बी हा भाग रद्द ठरवताना त्यामागचं घटनात्मक तरतुदीचं देखील कारण स्पष्ट केलं आहे. तीन सदस्यीय खंडपीठानं नमूद केल्यानुसार, घटनेच्या कलम ३६८(२) नुसार राज्य सूचीमधील विषयांबाबत घटनादुरुस्ती करायची झाल्यास, त्यासाठी एकूण राज्यांपैकी निम्म्या राज्य विधिमंडळांची मंजुरी घेणं आवश्यक आहे.

सहकार क्षेत्र किंवा सहकारी संस्था या घटनेच्या सातव्या परिशिष्टातील दुसऱ्या सूचीमध्ये समाविष्ट केल्यानुसार राज्यांच्या अखत्यातील विषय ठरतो. त्यामुळे याविषयी घटनादुरुस्ती करण्यासाठी आवश्यत असलेली निम्म्या राज्य विधिमंडळांची मंजुरी घेण्यात आलेली नसल्याची बाब सर्वोच्च न्यायालयाने अधोरेखित केली आहे.

Sharad Pawar’s decision was quashed by the Supreme Court but it will affect Amit Shah’s authority

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात